कराड : राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेते, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी मंगळवारी दुपारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कराडातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांना पेढे देत आशीर्वाद घेतला. पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील उंडाळकरांना बुके देत शुभेच्छा दिल्या. आता या शुभेच्छांची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.एकेकाळी सातारा जिल्हा काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे दोन गट होते. त्यामुळे या दोघांतील संघर्ष अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. मात्र मध्यंतरी चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर एकत्रित आले. नंतर पृथ्वीराज चव्हाण व ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी एकत्रित काम केले; पण काही महिन्यांपूर्वी ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी काँग्रेसचा हात सोडत राष्ट्रवादी (अजित पवार)चे घड्याळ मनगटावर बांधले. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन कुटुंबांत दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जाऊ लागले.मात्र, पृथ्वीराज चव्हाण व ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यात त्यानंतर देखील समन्वय असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्याचाच भाग म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवल्यानंतर देखील मंगळवारी ॲड. उदयसिंह पाटील स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाटण कॉलनीतील निवासस्थानी गेले. त्यांनी पृथ्वीराज बाबांशी हस्तांदोलन केले व त्यांचे आशीर्वादही घेतले. त्यावेळी चव्हाण यांनीदेखील शाल व बुके देत त्यांचा सत्कार तर केलाच; पण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. याचे फोटो समाज माध्यमांतून फिरल्यानंतर आता त्याच्या चर्चाही सुरू झालेल्या आहेत.यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार)चे पंचायत समिती सदस्य नितीन थोरात, काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या सुनंदा पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र बेडेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील आदी उपस्थित होते.काँग्रेसची अप्रत्यक्ष मदतचकराड तालुक्यात मुख्य लढत ही भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यातच झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घड्याळाला पसंती देत अप्रत्यक्ष मदत केली आहे.
Web Summary : Udaysingh Undalkar's meeting with Prithviraj Chavan sparks political buzz. Indirect Congress support to NCP(Ajit Pawar) in Karad raises eyebrows, fueling discussions about potential understandings between parties.
Web Summary : उदयसिंह उंडाळकर की पृथ्वीराज चव्हाण से मुलाकात से राजनीतिक चर्चा शुरू। कराड में कांग्रेस का एनसीपी (अजित पवार) को अप्रत्यक्ष समर्थन, पार्टियों के बीच संभावित समझ पर चर्चा।