शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

अपघातात नेपाळच्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 11:39 IST

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काशीळ, ता. सातारा येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत

अपघातात नेपाळच्या युवकाचा मृत्यू

सातारा : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काशीळ, ता. सातारा येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नरेश खडकसिंग बोहरा (वय २७, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. काशीळ) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी सहा वाजता झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नरेश बोहरा हा गेल्या काही वर्षांपासून काशीळ येथील एका ढाब्यावर वेटरचे काम करत होता. बुधवारी सायंकाळी काही कामानिमित्त तो दुचाकीवरून जात असताना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नरेश हा दूरवर फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखम झाली. रुग्णवाहिकेतून त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

 

अपघातात मृत्यू झालेल्या युवकावर गुन्हा

सातारा : टॅक्टरखाली सापडून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक फिरोज रज्जाक पठाण (वय ३२, रा. अंतरवल्ली ता. भुम जि. उस्मानाबाद) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील शिवराज पेट्रोल पंपासमोर २५ मार्च रोजी फिरोज पठाण हा उसाने भरलेला टॅÑक्टर घेऊन निघाला होता. यावेळी चढावर टॅÑक्टर चढत नव्हता. त्यामुळे टॅÑक्टरवरून खाली उतरून पठाण हा ट्रॉलीला ऊटी लावण्याचा प्रयत्न करत होता. याचवेळी अचानक टॅÑक्टर ट्रॉलीच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली तो सापडला. महामार्गावर घासत पुढे गेल्याने तो गंभीर जखमी झाला. यातच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर फिरोज पठाण याचा स्वत:च्या मृत्यूस हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष पोलिसांना काढला. त्यानंतर त्याच्यावर मोटार वाहन कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर