शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृतीसाठी साहित्य संमेलनाची गरज : चव्हाण

By admin | Updated: November 29, 2015 00:50 IST

सोळशीत साहित्यिकांची मांदियाळी : साहित्य व नाटक संमेलनासाठी निधी मिळावा; संमेलनाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची मागणी

वाठारस्टेशन : ‘ज्या देशात नैसर्गिक साधन संपत्तीचा अभाव असतो, तेथे बौद्धिक संपदा देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असते, अशी बौद्धिक संपदा ही निर्माण करण्यासाठी संस्कृती कलेल्या विकासातून वाढीस लागते. सोळशीसारख्या डोंगरकपारीच्या भागात भरणारी अशी राज्यस्तरीय साहित्य संमेलने संस्कृती टिकविण्यासाठी गरजेची आहेत,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सोळशी, ता. कोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले हे होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज, धारेश्वर महाराज, आ. आनंदराव पाटील, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, मराठी विश्व सािहत्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे, संमेलन स्वागताध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, राजूशेठ लोढा, माजी आमदार सतीश देशमुख, छत्रपती संभाजी पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे यांच्याकडे संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करण्यात आली व ‘वसनातीर’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. चव्हाण म्हणाले, ‘साहित्यात राजकारणी आले की काही मुद्दे उपस्थित होतात; मात्र ग्रामीण भागात होणारे हे साहित्यसंमेलन त्याला अपवाद आहे. तसे पाहता देशाचा विकास भौतिक मोजमापावर होतो; मात्र समाजाचा विकास तिथल्या सांस्कृतिक मापदंडावर आधारित असतो. त्यामुळे संस्कृती टिकवणे गरजेचे आहे. साहित्यात मराठी, इंग्रजी असा भाषिक वाद नेहमीच होत असतो. इंग्रजीला विरोध अनेक वर्षांपासून आहे. आम्ही शाळेत असताना इंग्रजीविरोधी धोरण शासनाने राबविले व आठवीनंतर इंग्रजी विषय सुरू केला त्याचा फटका माझ्यासह तीन पिढ्यांना बसला. त्यामुळे आज केंद्रात असलेल्या १५० सचिवांमध्ये एकही मराठी अधिकारी दिसत नाहीत. त्यामुळे संस्कृती टिकविण्यासाठी मराठी बरोबरच ज्ञानगंगा म्हणून इंग्रजी आवश्यक आहे.’ संमेलनाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे म्हणाले, ‘मी साहित्यिक म्हणून घडण्यात गावसंस्कृतीने शब्द व साहित्य दिले. तेथील माणसं वाचली, निसर्ग जवळून पाहिला यातून साहित्यिक म्हणून घडलो. साहित्य वैभव निर्माण करायचे असेल तर युवकांनी, मुलांनी लिहितं झालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या वेदना, दुष्काळाच्या झळा शब्दातून मांडल्या पाहिजेत. शासनाने यासाठी अशी साहित्य संमेलने गावोगावी भरवावीत.’ अशा संमेलनांना २५ लाखांचा निधी द्यावा. तर गाव तिथे वाचनालये सुरू करावीत. नाटक हा साहित्याच अविभाज्य भाग आहे. गावागावात नाट्यमंडळं निर्माण झाली पाहिजेत. यासाठी १५ लाख अनुदान देण्यात यावे.’ कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन भोसले, मठाधिपती नंदगिरी महाराज, स्वागताध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. शनैश्वर सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक कदम यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)