शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Satara: वाहनांतील डिझेल चोरणारी नवी मुंबईची टोळी अटकेत, जिथं चोरी तिथंच विक्री

By दत्ता यादव | Updated: October 10, 2023 14:02 IST

सातारा : महामार्गावर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्यांच्याकडून चोरीचे डिझेल आणि मोबाइल, ...

सातारा : महामार्गावर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्यांच्याकडून चोरीचे डिझेल आणि मोबाइल, तसेच एक वाहन हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी रात्री दहा वाजता करण्यात आली.करण जगदीश निर्मल (वय २९ गणेश सोसायटी, जुगाव वाशी, मुंबई), राशीद जावेद खान (वय २८, रा. पिंताबर अपार्टमेंट, जुगाव वाशी, मुंबई), धीरज नरेंद्र वर्मा (वय २२, रा. कोपरखैरणे, बोनकोवडे, मुंबई), समीम साहेबमियाॅं हुसेन (वय १९, रा. दाखिलभाई बालकृष्ण पाटील नेरुळ गाव राममंदिर जवळ, नवी मुंबई) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास विश्रांतीसाठी अनेक मालट्रक थांबत असतात. हीच संधी साधून ही टोळी या वाहनांतील डिझेल चाेरत होती. अशा प्रकार वारंवार घडत असल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल यांनी एलसीबीचे एक स्वतंत्र पथक तयार केले. हे पथक रात्रीच्या सुमारास सातारा ते शिरवळ असे गस्त घालत होते.दरम्यान, पाचवड, ता. वाई गावच्या हद्दीतील एका हाॅटेलसमोर वरील संशयित हे कार थांबवून डिझेल खरेदी करावयाचे आहे का, अशी वाहनचालकांना विचारणा करत होते. हा प्रकार तातडीने गस्तीवर असलेल्या एलसीबीच्या पथकला तसेच भुईंज पोलिसांना समजला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेऊन चारही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली. त्यांच्याजवळ असलेल्या कॅनमधील डिझेल भुईंजजवळील प्रतापगड ढाब्यासमोर उभ्या असलेल्या एका टेम्पोमधून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. हे चोरीचे डिझेल आणि चोरीसाठी वापरलेली कार, मोबाइल, असा सुमारे ४ लाख ५१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र मोरे, पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, सचिन साळुंखे, सनी आवटे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, पृश्वीराज जाधव आदींनी कारवाईत भाग घेतला. 

जिथं चोरी तिथंच विक्री..या टोळीने ज्या परिसरात डिझेल चोरलं. त्याच परिसरात डिझेल विक्री करत होते. यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे डिझेल चोरी करून विक्री केल्याने त्यांचे धाडस वाढले. त्यामुळेच पुन्हा त्याच ठिकाणी डिझेल विक्रीचा त्यांचा डाव पोलिसांनी धुळीस मिळविला.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस