शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपा'विरोधात 'राष्ट्रवादी' एकवटली, साताऱ्यात घड्याळ–तुतारीची युती; शशिकांत शिंदेंनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 19:30 IST

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुकी लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

सातारा : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुकी लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 'भाजपकडून सर्व पक्ष संपवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत, त्यामुळेच भाजपविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, असे स्पष्ट मत शिंदे यांनी व्यक्त केले. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत संयुक्त लढ्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा एकनाथ शिंदे यांन पाठिंबा, सर्वच चकित! आली उद्धव सेनेची पहिली प्रतिक्रिया

माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, सध्या राज्यात भाजपकडून इतर राजकीय पक्षांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विचारसरणी आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच सातारा जिल्ह्यात भाजपविरोधात एकत्रितपणे निवडणूक लढवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी बहुतांश ठिकाणी अजित पवार गटाचे घड्याळ हे चिन्ह वापरून उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत. तर काही ठिकाणी राजकीय समीकरणे पाहून शरद पवार गटाचे तुतारी हे चिन्ह वापरले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्थानिक पातळीवरील समन्वय साधून चिन्हांचे वाटप करण्यात आले असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.

साताऱ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, या युतीचा निवडणूक निकालांवर काय परिणाम होतो, याकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार