रणजितसिंह निंबाळकर यांची गत ‘दीड दिसात अन् कोल्ह उसात’ सारखी; सक्षणा सलगर यांची टीका

By दीपक शिंदे | Published: April 8, 2024 03:25 PM2024-04-08T15:25:03+5:302024-04-08T15:26:07+5:30

'मोदींच्या नावावर मतं घेऊन गेले ते तिकडेच'

Nationalist Congress Sharad Pawar party's young state president Sakshana Salgar criticizes Ranjitsinh Nimbalkar | रणजितसिंह निंबाळकर यांची गत ‘दीड दिसात अन् कोल्ह उसात’ सारखी; सक्षणा सलगर यांची टीका

रणजितसिंह निंबाळकर यांची गत ‘दीड दिसात अन् कोल्ह उसात’ सारखी; सक्षणा सलगर यांची टीका

सातारा : माढ्याच्या खासदारांची दीड दिसात अन् कोल्ह उसात, अशी गत झाली आहे. मी माढ्यात दहा दिवस दौरा केला. सांगोला, माळशिरस, नातेपुते, करमाळा, टेंभुर्णी याठिकाणी जाऊन आले. लोकांशी बोलले. यावेळी खासदार काळा की गोरा ते माहीत नाही. मोदींच्या नावावर मतं घेऊन गेले ते तिकडेच. मोदींच्या हवेत सगळे खासदार झालेत. कोणीच कामाचे नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचा समाचार घेतला.

सातारा येथे राष्ट्रवादी भवनात आयोजित असंघटित कामगारांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा-जावळीचे नेते दीपक पवार, कविता म्हेत्रे, संजना जगदाळे, संगीता साळुंखे, समिंद्रा जाधव, रमेश उबाळे, असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष ननावरे आदी उपस्थित होते.

सक्षणा सलगर म्हणाल्या, ‘पैलवानांचं शहर अशी कोल्हापूरची ख्याती आहे. परंतु, चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून पळून येत पुण्यातल्या एका महिलेच्या तयार मतदारसंघात डल्ला मारला. आता ते भल्या-भल्यांना लोळवलेल्या वस्तादाला आव्हान देत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Nationalist Congress Sharad Pawar party's young state president Sakshana Salgar criticizes Ranjitsinh Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.