शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

मोदी-शाह महाराष्ट्राचे शत्रू , संजय राऊतांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 18:01 IST

मी पुन्हा येईन, पण फौजदाराचा शिपाई बनून नव्हे; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

ढेबेवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मात्र, त्यांना ते शक्य होत नसल्याने त्यांनी शिवसेना तोडली. मोदी आणि शाह हेच खरे मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत,’ असा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. राज्यातील सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू पाटण आणि सातारा हाच आहे, येथील गद्दारांनी राज्याची बदनामी केली, ही बदनामी धुवून काढण्यासाठी गद्दारीचे बीज उखडून टाकण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.गुढे, ता. पाटण येथील कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार राऊत यांनी सत्ताधाऱ्यांसह भारतीय जनता पक्षावरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख हर्षद कदम, तालुकाप्रमुख सचिन आचरे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, प्रवीण शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले, ‘मुंबईत मराठी माणसाला सन्मानाने जगता यावे, यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना ही आग आहे, ती कुणालाही विझविता येणार नाही. याच शिवसेनेने महाराष्ट्राला आणि मुंबईला वाचवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या या मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. मात्र, जोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत हा प्रयत्न यशस्वी होणार नाही म्हणूनच शिवसेना तोडण्याचे पाप मोदी आणि शाह यांनी केले.चाळीस गद्दारांना घेऊन निर्माण झालेले हे महाराष्ट्रातील सरकार दोनच महिन्यांत कोसळणार आहे. या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण आणि सातारा हाच आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले, त्यांच्याच वारसदाराने गद्दारीची बीजे पेरून महाराष्ट्राची बदनामी केली. ही बीजे उखडून पाटणमध्ये भगवा फडकला, असे आवाहनही त्यांनी केले. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी कितीही सभा घेतल्या तरीही कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे. २०२४ मध्ये केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यांमध्ये देवेंद्र दिसणार नाहीत. प्रा. नितीन बानुगडे-पाटील, तालुकाप्रमुख सुरेश पाटील, जिल्हा प्रमुख हर्षद कदम आदींची भाषणे झाली. सचिन काळभोर यांनी प्रास्ताविक केले. सचिन आचरे यांनी स्वागत केले. दादासाहेब नलवडे यांनी आभार मानले.

मी पुन्हा येईन; पण फौजदाराचा शिपाई बनून नव्हे..

या तालुक्यात मी पुन्हा येईन; पण देवेंद्रासारखा नव्हे, फौजदाराचा शिपाई बनून तर या तालुक्यावर पुन्हा भगवा फडकलेला पाहण्यासाठी, असे खासदार राऊत म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

लोकनेते खऱ्या अर्थानं लोकनेते होते; पण...लोकनेते खऱ्या अर्थानं लोकनेते होते; पण त्यांच्या घराण्यात गद्दारीची घाण कुठून आली. राज्याच्या गद्दारीचा केंद्रबिंदूच पाटण असल्याने तो आता उखडून टाकायला हवा. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहSanjay Rautसंजय राऊत