शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांवरून महाबळेश्वरवाडी नाव

By admin | Updated: March 27, 2015 23:59 IST

निसर्गरम्य ठिकाण : दोन्ही महायुद्धांत अनेक सुपुत्रांचा सहभाग

सिद्धार्थ सरतापे - वरकुटे मलवडी  ता. माण या गावापासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर आणि श्री भोजलिंग डोंगराच्या जवळ निसर्गरम्य परिसरात वसलेल्या महाबळेश्वरवाडीला ऐतिहासिक महत्त्व आहे. या गावाच्या उत्तरेस स्वयंभू श्री महादेवाचे मंदिर तर पूर्वेस हेमाडपंथी हरिश्वराचे मंदिर आहे. या दोन्ही देवांच्या मंदिरावरूनच पुढे महाबळेश्वरवाडी हे नाव रुढ झाले. महाबळेश्वरवाडी हे महाबळेश्वरप्रमाणेच निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील तलावामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली आली आहे. तसेच चार गावांच्या पाणीपुरवठा योजना येथील तलावावर चालतात. येथील अनेक सुपुत्रांनी पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. तसेच आजही अनेकजण सैन्यात कार्यरत आहेत. महाबळेश्वरप्रमाणेच हे गाव उंचावर वसलेली आहे. या गावातील अनेकजण सैन्यात कार्यरत होते व आहेत. पहिल्या महायुद्धात मालोजी तुकाराम कोरेडे सहभागी झाले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात धोंडिराम सखाराम घोरपडे, मारुती सखाराम घोरपडे हे दोघे बंधू सहभागी होते. त्यांच्याबरोबरच ज्ञानू सावळाराम जगताप, कृष्णा महादू काटकर, कुंडला कृष्णा जेडगे, सुदाम बापू पुकळे, पांडुरंग दादू जेडगे यांचाही सहभाग होता. १९६२ मध्ये चिनबरोबर आपले युद्ध झाले. त्यामध्ये बाबासाहेब मालोजी कोरडे यांनी सहभाग घेतला होता. १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात बाबासाहेब लहू निंबाळकर आणि प्रभाकर मारुती निंबाळकर यांनी चिनी सैन्याचा मुकबला केला होता. अशा प्रकारे एकूण २६ जणांनी देशाची सेवा केली आहे. आजही या गावातील अनेकजण देशसेवेत कार्यरत आहेत. महाबळेश्वरवाडी गावातील बाळासाहेब कुंडलिक जगताप हे श्रीलंका येथे शांतीसेनेतून गेले होते. त्यानंतर कारगिल युद्धातही त्यांनी मोलाचा सहभाग घेतला होता. याशिवाय कॅप्टन महादेव जगन्नाथ निंबाळकर आणि सुभेदार मेजर उत्तम चंद्रू पुकळे या सारख्या जवानांनी उच्चपदावर काम केले आहे. ब्रिटिश सरकारचा ‘जंगी ईनाम’ महाबळेश्वरवाडीच्या गजीढोल पथकाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. कुरुंदवाडी येथील यात्रेतील स्पर्धेत महाबळेश्वरवाडीच्या पथकाने ‘सोन्याचं कडं’ जिंकून आणले होते, असे सांगण्यात येते. याच गावातील मालोजी कोरडे यांना ब्रिटिश सरकारतर्फे ‘जंगी ईनाम’ म्हणून महिना पाच रुपये त्यांच्या तीन पिढ्यांकरिता जाहीर झाला होता. महाबळेश्वरवाडीचा हा स्वाभिमान आहे, असे येथील जवान छातीठोकपणे सांगतात. सत्तर जण गलई व्यवसायात...येथील अनेकजण सैन्यात आहेत. तसेच सुमारे सत्तर जण गलई (आटणी) व्यवसायात आहेत. देशभर ते विखुरले आहेत. पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात ते सोने-चांदीचा व्यवसाय करीत आहेत.