खून करून पसार झालेल्या जावयाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 14:14 IST2019-05-07T14:13:24+5:302019-05-07T14:14:45+5:30

चार दिवसांपूर्वी करंजे येथे सासऱ्याचा खून करुन पसार झालेल्या मनोज उर्फ मल्लिकार्जुन शंकर दोडमणी (वय ३२, रा.करंजे) याला अखेर शाहूपुरी पोलिसांनी गुलबर्गा, कर्नाटक राज्यातून अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

The murder of the murderer was arrested | खून करून पसार झालेल्या जावयाला अटक

खून करून पसार झालेल्या जावयाला अटक

ठळक मुद्देखून करून पसार झालेल्या जावयाला अटक न्यायालयाने सुनावली दोन दिवस पोलीस कोठडी

सातारा: चार दिवसांपूर्वी करंजे येथे सासऱ्याचा खून करुन पसार झालेल्या मनोज उर्फ मल्लिकार्जुन शंकर दोडमणी (वय ३२, रा.करंजे) याला अखेर शाहूपुरी पोलिसांनी गुलबर्गा, कर्नाटक राज्यातून अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

मनोज याने त्याच्या मित्रासोबत सासरे विलास बनसोडे (वय ६०, रा. सदर बझार सातारा) यांचा लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृण केला होता. या प्रकारानंतर दोडमणी मित्रासमवेत पसार झाला होता. गेल्या तीन दिवसांपासून शाहूपुरी पोलीस त्याच्या मागावर होते.

Web Title: The murder of the murderer was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.