साताऱ्यात गळा चिरून वृद्ध महिलेची हत्या, मध्यरात्रीची घटना; कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:33 PM2021-01-16T12:33:46+5:302021-01-16T12:35:32+5:30

Crimenews Murder Satara- सातारा शहराचे उपनगर असलेल्या कृष्णानगरमध्ये एका ६५ वर्षीय वृद्धेचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप समोर आले नाही.

Murder of an elderly woman by slitting her throat in Satara, midnight incident; The reason is unclear | साताऱ्यात गळा चिरून वृद्ध महिलेची हत्या, मध्यरात्रीची घटना; कारण अस्पष्ट

साताऱ्यात गळा चिरून वृद्ध महिलेची हत्या, मध्यरात्रीची घटना; कारण अस्पष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देसाताऱ्यात गळा चिरून वृद्ध महिलेची हत्यामध्यरात्रीची घटना; कारण अस्पष्ट

सातारा: शहराचे उपनगर असलेल्या कृष्णानगरमध्ये एका ६५ वर्षीय वृद्धेचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप समोर आले नाही.

जया गणेश गायकवाड-पाटील असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जया पाटील यांचा कृष्णानगर येथील गजानन हौसिंग सोसायटीमध्ये बंगला आहे. या बंगल्यात त्या एकट्याच वास्तव्यास होत्या. त्यांचा मुलगा शेंद्रे येथे वास्तव्यास आहे तर मुलीचे लग्न झाले असून, ती सासरी राहते.

दरम्यान, शनिवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरात आढळून आल्यानंतर काही नागरिकांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

जया पाटील यांचा खून संपत्ती की अन्य कोणत्या कारणातून झाला आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. त्यांच्या घरात रात्री कोणी आले होते का, याचीही पोलीस शेजाऱ्यांकडे चौकशी करत आहेत. या खुनामुळे कृष्णानगर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title: Murder of an elderly woman by slitting her throat in Satara, midnight incident; The reason is unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.