शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Satara: लाच प्रकरणातील मुंबईच्या फौजदारासह एकाला अटक, न्यायाधीश निकम यांचा जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:58 IST

२१ पर्यंत पोलिस कोठडी 

सातारा : फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या मुंबई पोलिस दलातील सहायक फौजदारासह अन्य एकाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी अटक केली. न्यायालयाने दोघांनाही २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यातील प्रमुख संशयित न्यायाधीश धनंजय निकम यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

आनंद मोहन खरात (रा. खरातवाडी, दहिवडी, ता. माण) तसेच मुंबई येथे कार्यरत असलेला सहायक फाैजदार किशोर संभाजी खरात (रा. सांगली, सध्या बीडीडी चाळ वरळी, मुंबई) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत एका युवतीने तक्रार दिली होती. तिच्या वडिलांवर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्यांना अटक केली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन मिळण्यासाठी त्यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. तो तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. तो जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी किशोर खरात व आनंद खरात यांनी न्यायाधीश निकम यांच्या सांगण्यानुसार महिलेकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायाधीश निकम यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश जोशी यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, या गुन्ह्यामधील आनंद खरात, तसेच किशोर खरात हे दोघे सोमवारी दुपारी स्वत:हून जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठविले. मंगळवारी दुपारी लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी या दोघांचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली होती. दुपारी न्यायालयाने मुंबईच्या फाैजदारासह अन्य एकाला अटक करण्याची परवानगी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणCourtन्यायालयPoliceपोलिस