'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; उदयनराजेंनी त्या होमगार्डला फोन केला, अन्..

By दीपक शिंदे | Updated: December 4, 2024 18:26 IST2024-12-04T18:23:13+5:302024-12-04T18:26:05+5:30

उदयनराजे भोसले यांचे आवाहन : होमगार्डने दिला होता आत्महत्येचा इशारा

MP Udayanraje Bhosle called Sadashiv Dhakne of Jalna district, who climbed a mobile tower and threatened to commit suicide demanding that MLA Shivendraraje Bhosle be included in the cabinet | 'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; उदयनराजेंनी त्या होमगार्डला फोन केला, अन्..

'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; उदयनराजेंनी त्या होमगार्डला फोन केला, अन्..

सातारा : छत्रपती घराण्याचा मान राखा, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून चांगले पद द्यावे, अशी मागणी करत जालना जिल्ह्यातील सदाशिव ढाकणे या कर्मचाऱ्याने बुधवारी ‘मोबाइल टॉवर’वर चढून आत्महत्येचा इशारा दिला. याची माहिती मिळताच खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यास फोन करून समजूत काढली. तो टॉवरवरून उतरत नसल्याने उदयनराजे यांनी माझी शपथ आहे, जिवाचं बरं-वाईट करू नको, असे सांगितल्यानंतर ढाकणे खाली उतरला.

राजूर-टेंभुर्णी रोडवर असलेल्या एका मोबाइल टॉवरवर बुधवारी सकाळी सदाशिव ढाकणे हा चढला. त्याने महायुतीच्या नेत्यांना चार तासांची मुदत देऊन मंत्रिमंडळात कॅबिनेटपदी शिवेंद्रराजे यांना घ्यावे, अशी मागणी केली. छत्रपती घराण्याचा मान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आदी नेत्यांनी राखावा, असे आवाहन करत मोबाइल टॉवरवरून खाली उडी टाकण्याचा इशारा दिला.

याची माहिती कळताच खासदार उदयनराजे भोसले यांनी त्या युवकाचा नंबर मिळवून त्यास फोन केला. त्याची चौकशी करून तुमचं आयुष्य एवढं स्वस्त नाही. तुमच्या भावना कळल्या आहेत. तुम्ही खाली उतरा. मेहरबानी करा, पण डोक्यात असे विचार आणू नका. तुमच्या कुटुंबीयांनी कोणाकडे बघून जगायचं. माझी शपथ आहे, छत्रपती शिवरायांची शपथ देतो. खाली उतरा, असे आवाहन केल्यानंतर तो युवक खाली उतरला.

Web Title: MP Udayanraje Bhosle called Sadashiv Dhakne of Jalna district, who climbed a mobile tower and threatened to commit suicide demanding that MLA Shivendraraje Bhosle be included in the cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.