माझ्यावर पोटभरून टीका करा, पण इतकीही नको की नाहीतर..; उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर मिश्कील टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 14:35 IST2022-03-01T14:34:58+5:302022-03-01T14:35:30+5:30
‘माझी उंचीच तेवढी आहे, त्यामुळे मी हवेतच असतो. तुम्ही माझ्याइतक्या उंचीवर पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

माझ्यावर पोटभरून टीका करा, पण इतकीही नको की नाहीतर..; उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर मिश्कील टीका
सातारा : ‘काहींना माझ्यावर टीका केल्याशिवाय झोपच लागत नाही. हाताची बोटे कधीच सारखी नसतात. काहींचा स्वभाव प्रेमळ असतो, तर काहींना टीका केल्याशिवाय झोपच येत नाही. त्यामुळे त्यांना मी दोष देणार नाही,’ अशी मिश्कील टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर केली आहे.
जिल्हा परिषदेच्या मैदानावर वाढदिवसाच्या कार्यक्रमात खा. उदयनराजेंची एंट्री हवेतून उडणाऱ्या बुलेटवरून झाली होती. यावरून आ. शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंचे सगळे हवेतच असते, अशी टीका केली होती, त्या टीकेला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, ‘माझी उंचीच तेवढी आहे, त्यामुळे मी हवेतच असतो. तुम्ही माझ्याइतक्या उंचीवर पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. माझ्यापेक्षा त्यांनी मोठी उंची गाठावी, अशी माझी इच्छा आहे. तसेच माझ्यावर पोटभरून टीका करावी; पण इतकीही टीका करू नका, नाहीतर पोट सुटेल.
माझी उंचीच तेवढी आहे, त्यामुळे मी हवेतच असतो. आपण कधी माझ्याइतक्या उंचीवर पोहोचणार याचा विचार करा. उलट त्यांनी माझ्यापेक्षा मोठी उंची गाठावी; पण त्यांना समजतच नसेल तर मी काय करणार, असेही उदयनराजे म्हणाले.