ग्रेड सेपरेटरच्या पालिकेकडे हस्तांतरणाच्या हालचाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:34 AM2021-01-17T04:34:54+5:302021-01-17T04:34:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : येथील बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले असल्याने तो सातारा पालिकेकडे देखभाल-दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्याच्या ...

Movements of transfer of grade separator to the municipality! | ग्रेड सेपरेटरच्या पालिकेकडे हस्तांतरणाच्या हालचाली!

ग्रेड सेपरेटरच्या पालिकेकडे हस्तांतरणाच्या हालचाली!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : येथील बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले असल्याने तो सातारा पालिकेकडे देखभाल-दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या आहेत. याबाबत लवकरच पालिकेला लेखी पत्र दिले जाणार असल्याची खात्रीशीर वृत्त आहे.

तब्बल ७५ हजार कोटी रुपये खर्चून सातारा शहरात ग्रेड सेपरेटर बांधण्यात आलेला आहे. या ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले असताना त्याच्या उद‌्घाटनाची प्रतीक्षा होती; परंतु खासदार उदयनराजे भोसले यांनी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत जाऊन ग्रेड सेपरेटरचे उद‌्घाटन केले.

उद‌्घाटनाबाबत प्रशासनाची कोणतीच तयारी नसताना हा कार्यक्रम घाईगडबडीने झाला. या कार्यक्रमानंतर प्रशासन अवाक‌् झाले; तर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये बांधकाम अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही ग्रेड सेपरेटरचे प्रशासकीय संकेतांनुसार ग्रेड सेपरेटरचे उद‌्घाटन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता तारीख आणि वेळ ठरवून हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मंत्रीही साताऱ्यात उपस्थित राहणार आहेत.

ग्रेड सेपरेटरच्या उद‌्घाटनाची सातारा पालिकेला घाई झाली होती. आता हा ग्रेड सेपरेटर पालिकेकडे हस्तांतरित केला जाणार आहे. तिथून पुढे देखभाल व दुरुस्ती ही पालिकेलाच करावी लागणार आहे. प्रशासकीय पातळीवर याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत.

चौकट..

सीसीटीव्ही बसविण्याची गरज

ग्रेड सेपरेटरमुळे पोवई नाका परिसरातील वाहतूक कोंडी थांबलेली आहे. मात्र येथील वाहनांचा वेगही वाढलेला आहे. साहजिकच ग्रेड सेपरेटरमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या ठिकाणी एकही सीसीटीव्ही बसविण्यात आलेला नसल्याने धोका आहे.

चौकट...

पर्यटकांची जुन्याच रस्त्यावर

पुणे-मुंबई-कोल्हापूर, बारामतीच्या दिशेने कास, वासोटा, ठोसेघर धबधबा, भांबवली धबधबा पाहण्यासाठी येणारे पर्यटक ग्रेड सेपरेटरच्या रस्त्याचा वापर करू शकणार नाहीत; कारण बसस्थानकाकडून ग्रेड सेपरेटरमध्ये प्रवेश करणारी वाहने ही सातारा शहराच्या पश्चिमेकडे जाऊ शकत नाहीत. त्यांना रहिमतपूर अथवा कोरेगाव रस्त्याकडे जावे लागते. त्यामुळे पर्यटकांची वाहनेही जुन्याच रस्त्यावर येणार आहेत.

फोटो वापरावा.

Web Title: Movements of transfer of grade separator to the municipality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.