शहरं
Join us  
Trending Stories
1
Train Update : वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
2
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
3
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
4
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
5
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
6
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
7
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
8
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
9
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
10
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
11
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
12
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
13
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
15
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
16
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
17
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
18
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
19
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
20
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण

Satara: धनगर आरक्षणासाठी खंबाटकी घाटात पाच तास महामार्ग रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 15:19 IST

खंडाळा (जि.सातारा) : धनगर समाज आरक्षणासाठी खंडाळा तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारी दुपारी पाच तास चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे सुमारे ...

खंडाळा (जि.सातारा) : धनगर समाज आरक्षणासाठी खंडाळा तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारी दुपारी पाच तास चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे सुमारे साठ किलोमीटर साताऱ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर पावणेसहा वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.

खंडाळा तालुक्यातील समाज बांधवांनी काही वर्षांपूर्वी साखळी उपोषण केले होते; मात्र शासन पातळीवर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने लोणंद येथे गणेश केसकर यांनी उपोषण सुरू केले. गेल्या पंधरा दिवसांत या उपोषणाची दखल शासनाने घेतली नसल्याने धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलनाचा पर्याय निवडला आहे. या आंदोलनासाठी तालुक्यासह भागातील इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात धनगर समाजातील महिलांसह समाजबांधव जमले होते.चक्का जाम आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना चाळीस पन्नास किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक लोणंद मार्गे वळविण्यात आली; मात्र तो मार्गही कोंडला होता. त्यामुळे पोलिस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते.

साताऱ्यापर्यंत वाहनांच्या रांगा..आरक्षणाच्या मागणीसाठी महामार्ग रोखल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. खंडाळा ते सातारा आणि खंडाळा ते कात्रज पुणेपर्यंत दोन्ही बाजूला ५० किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय सरकारने तातडीने घ्यावा. आज महामार्ग रोखला आहे, उद्या मुंबईचे सर्व रस्ते अडवू. आरक्षणासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. राज्य सरकारकडे परिपत्रक काढण्यासाठी मागणी आहे; परंतु सरकारला जाग आणण्यासाठी समाजात जागृती झाली पाहिजे. धनगर समाजाला विचारात घेतले नाही तर अनेक विधानसभा मतदारसंघात आमच्याशिवाय आमदार जाऊ शकत. - गोपीचंद पडळकर, आमदार

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDhangar Reservationधनगर आरक्षण