Satara: भाटमरळीच्या गिर्यारोहकाने सर केला अजस्त्र कोकण कडा, १८०० फुटावर केले रॅपलिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:15 IST2025-04-03T16:14:37+5:302025-04-03T16:15:01+5:30

दगडांवर पाय ठेऊन तयार केली वाट

Mountaineer Swapnil Srirang Jadhav from Bhatmarli in Satara taluka rappelled on the 1800 foot deep Konkan ridge | Satara: भाटमरळीच्या गिर्यारोहकाने सर केला अजस्त्र कोकण कडा, १८०० फुटावर केले रॅपलिंग 

Satara: भाटमरळीच्या गिर्यारोहकाने सर केला अजस्त्र कोकण कडा, १८०० फुटावर केले रॅपलिंग 

सातारा : सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे अस्तित्व आजही टिकून आहे. येथील गड, किल्ले, दुर्ग, दऱ्या-खोऱ्या, ऐतिहासिक स्थळे त्याची साक्ष देतात. शिवरायांची थोरवी गाणारा हा शिवकालीन इतिहास जाणण्यासाठीच सातारा तालुक्यातील भाटमरळी येथील सुपुत्र, साहसी गिर्यारोहक स्वप्नील श्रीरंग जाधव याने १८०० फूट खोलीच्या कोकण कड्यावर रॅपलिंग केलंय.

गेली १० वर्षे सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकंती करणाऱ्या स्वप्नील श्रीरंग जाधव यांनी दीडशे हून अधिक गड - किल्ले, दुर्ग आणि व्हॅली यांच्या मोहिमा फत्ते केल्या आहेत. अंगावर शहारे आणणारी सांधण व्हॅली, माहुली गड परिसरातील प्रसिद्ध वजीर सुळका, मोरोशीचा भैरवगड, लिंगाणा, तैलबैला, कळकराय सुळका, वानरलिंगी सुळका, सह्याद्रीच्या कुशीतील कोकण कड्यावर रॅपलिंग व क्लाईंबिंगचा थरार त्यांनी अनुभवला आहे.

कोकणकड्यावर २० मिनिटांत रॅपलिंग

एक हजार फूट उंचीच्या या सह्याद्रीतील प्रचंड रौद्र अशा कोकणकड्यावरून स्वप्नील जाधव यांनी २० मिनिटांत रॅपलिंग पूर्ण केले. पाचणाई येथून पहाटे चार वाजता हरिश्चंद्रगड चढण्यास सुरुवात केली. सकाळी सहा वाजता गडावर पोहचला व त्या दिवशीच दिवशी सकाळी सात वाजता कोकण कड्यावर पोहोचले.

सकाळी अकराच्या दरम्यान स्वप्नील जाधव यांनी कोकणकड्या वरून रॅपलिंग करायला सुरुवात केली. पहिला ९०० फुटांचा टप्पा पार करायला दहा मिनिटे लागली. हा टप्पा पूर्ण ओव्हरहॅंग म्हणजे, लटकत खाली जाणे असा आहे. दुसरा टप्पा हा ६०० फुटांचा आहे. तो त्याने सात मिनिटांत पार केला. तिसरा टप्पा ३०० फुटांचा आहे. हा टप्पा तीन मिनिटांत पार केला.

दगडांवर पाय ठेऊन तयार केली वाट

बेलपाडापर्यंत जाणारी वाट अतिशय अवघड आहे. वाटेमध्ये मोठी दगडांची वाट पार करून जावे लागले. वाट अशी नाहीच, अंदाजे दगडांवर पाय ठेऊन जिथे वाट दिसेल तेथे पाय रोवून जावे लागत होते. अतिशय कष्टदायक व परीक्षा पाहणारी वाट चालून जवळपास साडेपाच तासांचे पदभ्रमण करून पाच वाजता बेलपाडा येथे पोहचले. या मोहिमेचे आयोजन पवन घुगे व दर्शन यांनी केले. त्यांच्या बरोबर लतिकेश कदम यांनी साथ दिली. एकूण १२ सदस्यांनी कोकणकड्याचा १८०० फुटांचा टप्पा रॅपलिंग करीत पार केला.

स्वप्नील जाधव यांनी यशस्वी केलेले ट्रेक

  • कोकणकडा रॅपलिंग १८०० फूट
  • वजीर सुळका २८० फूट क्लाईंबिंग ९० डिग्री
  • कळकराय सुळका १५० फुट क्लाइंबिंग ९० डिग्री
  • वानरलिंगी सुळका ४५० फूट ९०डिग्री रॅपलिंग अँड क्लाइंबिंग
  • लिंगाणा ३००० फूट सरकडेकपारीतून हिंडला राजा माझा

आपल्या मुलांना मोबाइलच्या दुनियेतून बाहेर काढून आपले गड-किल्ले दाखवा. त्यांना आपला इतिहास प्रत्यक्षात बघू द्या. मोबाइलच्या बाहेरही एक जग आहे, त्याचे नाव आहे ‘सह्याद्री’ हे दाखवून द्या. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुस्तकांपुरता मर्यादित नाही हे त्यांनासुध्दा समजू द्या !  - स्वप्नील जाधव, गिर्यारोहक, भाटमरळी, सातारा

Web Title: Mountaineer Swapnil Srirang Jadhav from Bhatmarli in Satara taluka rappelled on the 1800 foot deep Konkan ridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.