आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 05:31 IST2023-08-28T05:31:16+5:302023-08-28T05:31:48+5:30

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या फेसबुक पेजवर दररोज शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम प्रसिद्ध केले जातात.

MLA Shivendrasinhraje Bhosale's Facebook page hacked | आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक

सातारा : भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुकवरील अधिकृत पेज अज्ञाताने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून रविवारी तक्रार करण्यात आली आहे. 

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या फेसबुक पेजवर दररोज शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम प्रसिद्ध केले जातात. मात्र, गेल्या तीन - चार दिवसांपासून ॲडमिनचा अधिकार काढून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पेजवर सर्च केल्यानंतर हे पेज हॅक केल्याचे स्पष्ट झाले.

सायबर सेलने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून, अमेरिकेतील फेसबुक कार्यालयाशी मेलद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज नेमके कोठून व कोणी हॅक केले, याची माहिती मागविण्यात आली आहे. 

Web Title: MLA Shivendrasinhraje Bhosale's Facebook page hacked