शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

Satara: झाडाणीप्रकरणात आमदार मकरंद पाटील लाभदायक, विराज शिंदे यांचा आरोप 

By नितीन काळेल | Updated: June 20, 2024 18:47 IST

अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काम; ५१ लाखांचा शासकीय निधी वापरला 

सातारा : झाडाणी गाव पुनर्वसित आहे. गावात एकही वस्ती नाही. तरीही वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आमदारपदाचा गैरवापर करुन वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दबावाखाली झाडाणी येथे वीजट्रान्स्फर आणि वीजजोडणी करण्यास लावली. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील ५१ लाखांचा निधी वापरण्यात आला. त्यामुळे आमदार पाटील जननायक नसून लाभदायक आहेत, असा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी केला.सातारा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई उपस्थित होते. विराज शिंदे म्हणाले, महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावातील लोक रायगड जिल्ह्यात पुनवर्सित झाले आहेत. गावात एकही मानवीवस्ती नाही. या गावात मोठ्या अधिकाऱ्यांनी आणि राजकीय लोकांनी जमिनी घेतल्यात. चंद्रकांत वळवी या अधिकाऱ्याचीही जमीन असल्याचे समजते. तसेच सालोशी येथील वळवी व सावे वस्ती येथे आदित्य चंद्रकांत वळवी यांनी सुमारे ४० एकरात अनाधिकृतरित्या रिसाॅर्टचे बांधकाम करुन अनेक झाडांची कत्तल केली.कोणत्याही प्रकारची राॅयल्टी न भरता मोठ्या प्रमाणात उत्खननही करण्यात आले आहे. या ठिकाणी रिसाॅर्टचे बेकायदेशीर बांधकाम करताना वीजपुरवठा करण्यात आला. यासाठी जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातून निधी उपलब्ध होण्यासाठी वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना शिफारस पत्र दिले होते. त्यानुसारच हा वीजपुरवठा करण्यात आला. आजही तेथे वळवीवस्ती अस्तित्वात नाही. मात्र, आमदार पाटील यांनी पदाचा गैरवापर करुन अधिकाऱ्यांवर दबाव आणला. त्यानंतरच रिसाॅर्टला वीजपुरवठा उपलब्ध झाला.

वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे पाटील यांच्यावर फाैजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे. अन्यथा उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करणार आहे, असा इशाराही विराज शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMakrand Patilमकरंद पाटीलMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान