लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:11 IST2019-06-10T16:10:44+5:302019-06-10T16:11:51+5:30
सातारा : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी एका युवकाला अटक ...

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ठळक मुद्देलग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचारशहर पोलिसांनी केली युवकाला अटक
सातारा : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी एका युवकाला अटक केली.
श्रीकांत उर्फ यमनुरी गिरीमल दोडमनी (वय २४, रा. सदर बझार सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोडमनी याने लग्नाचे आमिष दाखवून संबंधित मुलीला विजापूर येथे पळवून नेले. या ठिकाणी त्याने मुलीवर अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधित आरोपी दोडमनी याला विजापूर येथून ताब्यात घेतले.