साताराच्या संपर्कमंत्री पदी शिवेंद्रसिंहराजे भोसले; धाराशिवची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्याकडे

By दीपक देशमुख | Updated: February 4, 2025 21:26 IST2025-02-04T21:26:00+5:302025-02-04T21:26:53+5:30

भाजप कार्यकर्त्यांना मंत्री शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून पाठपुरावा करता येणार आहे.

Minister Shivendraraje Bhosale has been selected as the Communications Minister for Satara district | साताराच्या संपर्कमंत्री पदी शिवेंद्रसिंहराजे भोसले; धाराशिवची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्याकडे

साताराच्या संपर्कमंत्री पदी शिवेंद्रसिंहराजे भोसले; धाराशिवची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्याकडे

सातारा : ज्या जिल्ह्यात भाजपचा आमदार किंवा मंत्री नाही, त्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून भाजपने आपल्या मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर सातारा जिल्ह्याची तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे.

भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राष्ट्रीय सदस्यता अभियानांतर्गत मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, राष्ट्रीय सचिव पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या संपर्क मंत्र्यांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सातारा जिल्ह्यासाठी संपर्क मंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे. तर धाराशिवच्या संपर्कमंत्री पदी जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आली आहे.

अशी राहणार संपर्कमंत्र्यांची भूमिका

शासन दरबारी विविध विकासकामांसाठी भाजपचे पदाधिकारी पाठपुरावा करतात. त्यांची कामे व्हावीत, त्यांना कुठली अडचण येऊ नये यासाठी तसेच नागरिकांचे प्रश्न सुलभपणे सोडवले जावेत, यासाठी संपर्क मंत्री नेमलेले आहेत.

साताऱ्यात चार आमदार

सातारा जिल्ह्यात भाजपचे चार आमदार होते. परंतु, पालकमंत्री पद भाजपला मिळाले नाही. आता या ठिकाणी शिवेंद्रराजेंकडे संपर्क मंत्री पद आले आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांना मंत्री शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून पाठपुरावा करता येणार आहे.

Web Title: Minister Shivendraraje Bhosale has been selected as the Communications Minister for Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.