शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘एमआयएम’

By admin | Updated: August 22, 2015 00:53 IST

इनामदार : पश्चिम महाराष्ट्रातील निवडणूक रिंगणात उतरणार

कऱ्हाड : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लीम समाजाचा उपयोग केवळ व्होटबँक म्हणून केला आहे. त्यामुळे आगामी काळात ‘आॅल इंडिया मजलीस ए इत्तेहाद उल मुसलीमीन’ म्हणजेच ‘एमआयएम’ पक्ष दलित तसेच मुस्लिमांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे,’ अशी माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी दिली. कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘एमआयएम’च्या जिल्हाध्यक्षपदी कऱ्हाडचे माजी नगराध्यक्ष अल्ताफशिकलगार यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी शाकिर तांबोळी, शब्बीर पीरजादे आदी उपस्थित होते. ‘एमआयएम’विषयी माहिती देताना इनामदार म्हणाले, ‘पश्चिमङ्कमहाराष्ट्रात ‘एमआयएम’ पक्षबांधणीसाठी मोठी मोहीम हाती घेणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुका आमचा पक्ष सर्व ताकदीनिशी लढणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळेच मुस्लीम समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे हे दोन पक्षच आमचा मुख्य शत्रू असतील. त्यांनी आतापर्यंत मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांना निवडणुकीची तिकिटे दिली. मात्र निवडून आणण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. परिणामी मुस्लीम समाज सर्वच क्षेत्रात मागासलेला राहिला आहे. औरंगाबादमध्ये ज्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले आमचे नगरसेवक अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. तसेच काम राज्यात इतर ठिकाणीही करून दाखवणार आहोत.’ अल्ताफ शिकलगार म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुस्लिमांना केवळ आश्वासनेच दिली आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात त्यांच्यासह जातीयवादी पक्षांसाठी ‘एमआयएम’ हाच उत्तम पर्याय ठरणार आहे. (प्रतिनिधी)