शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

येरळा तलावात स्थलांतरित पक्ष्यांचा किलबिलाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 11:11 PM

वडूज : खटाव तालुक्यातील येरळवाडी व सूर्याचीवाडी येथील मध्यम प्रकल्पावर वाढत्या थंडीमुळे स्थलांतरित पक्षी मुक्कामास आल्याने किलबिलाट वाढला आहे. तसेच तलाव परिसरात पक्ष्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात दिसत असून, सकाळी व सायंकाळी या पाहुण्यांचे निरीक्षण करण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले येरळा तलावाकडे वळू लागली आहेत. मात्र, अद्यापही फ्लेमिंगोची प्रतीक्षा लागून राहिली आहे.येरळवाडी मध्यम ...

वडूज : खटाव तालुक्यातील येरळवाडी व सूर्याचीवाडी येथील मध्यम प्रकल्पावर वाढत्या थंडीमुळे स्थलांतरित पक्षी मुक्कामास आल्याने किलबिलाट वाढला आहे. तसेच तलाव परिसरात पक्ष्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात दिसत असून, सकाळी व सायंकाळी या पाहुण्यांचे निरीक्षण करण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले येरळा तलावाकडे वळू लागली आहेत. मात्र, अद्यापही फ्लेमिंगोची प्रतीक्षा लागून राहिली आहे.येरळवाडी मध्यम प्रकल्पात यावर्षी मुबलक पाणीसाठा झाल्याने अनेक स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. सध्या तलाव चित्रबलाक, करकोचा, कांडेसर, स्पून बिल, काळा शराटी, पान कावळा, खंड्या, कवड्या, कवड्या तुतारी, शेकाट्या, जांभळी पाणकोंबडी, चक्रवाक, नदीसुरय, सुतारपक्षी, ग्रे हेरॉन, चांदवा, कोतवाल आदी पाहुण्यांनी बहरला आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणांहून पक्षीप्रेमी तलाव परिसरात दाखल होत आहेत. पक्ष्यांच्या हालचाली पाहण्यासाठी सकाळी व सायंकाळी गर्दी होत आहे.दरम्यान, या सर्वांपेक्षा देखणा फ्लेमिंगो (रोहित, अग्निपंख) या परदेशी पाहुण्याची पक्षीप्रेमी वाट पाहत आहेत. गत आठवड्यात सुमारे १०० ते १५० पक्ष्यांचा थवा येरळवाडी तलावावर घिरट्या घालून गेला असल्याचे स्थानिक गुराख्यांनी सांगितले.मात्र, येरळवाडीत भरपूर पाणीसाठा असल्याने या पक्षांना खाद्य खाण्यासाठी व बसण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध नाही. त्यामुळे हे पक्षी परतले असल्याचा अंदाज त्यांनी व पक्षीप्रेमींनी व्यक्त केला.दरम्यान, दरवर्षी येरळवाडी तलावात फ्लेमिंगो पक्षी येत असतात. त्यांच्या निरीक्षणासाठी पक्षीप्रेमीही हजेरी लावतात. सध्या फ्लेमिंगो पक्षी आलेले नसल्याने काहीसे निराशेचे वातावरण आहे.दीडशे फ्लेमिंगोचा थवा...खटाव तालुक्यात वाढत्या गुलाबी थंडीच्या आगमनाबरोबर रंगाने गुलाबी असणाºया फ्लेमिंगोच्या (रोहित) आगमनाची प्रतीक्षा पक्षीमित्र करीत आहेत. खटाव तालुक्यातील येरळवाडी तलाव परिसरात फ्लेमिंगोची मुक्कामाची आवडती ठिकाणे आहेत. या तलावात मुबलक व पुरेसा पाणीसाठ्यासह खाद्य उपलब्ध असल्याने पक्षीमित्रांत आनंदाचे वातारणात आहे. यातील कोणत्या ठिकाणी परदेशी पाहुणे उतरणार? याची उस्तुकता त्यांना लागून राहिली आहे. सुमारे दीडशे फ्लेमिंगोचा थवा सुरक्षित पाणथळाच्या शोधात असल्याचे नुकतेच आढळून आले आहे.