भुर्इंजमध्ये मध्यरात्री तीन ज्वेलर्सची दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 16:30 IST2019-09-19T16:29:48+5:302019-09-19T16:30:59+5:30
भुर्इंज, ता. वाई येथील बाजार पेठेमध्ये तीन ज्वेलर्स दुकानामध्ये चोरट्यांनी धुडगूस घातला. दुकानातील ७ किलो चांदीचे दागिने, सोने व रोकड असा सुमारे ५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

भुर्इंजमध्ये मध्यरात्री तीन ज्वेलर्सची दुकाने फोडली
सातारा : भुर्इंज, ता. वाई येथील बाजार पेठेमध्ये तीन ज्वेलर्स दुकानामध्ये चोरट्यांनी धुडगूस घातला. दुकानातील ७ किलो चांदीचे दागिने, सोने व रोकड असा सुमारे ५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली.
ही घटना सकाळी समोर आल्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरू झाली. घटनास्थळी श्वानपथक आणि फिंगर प्रिंट्स पथकाला पाचारण करण्यात आले.भुर्इंजच्या बाजार पेठेमध्ये ज्वेलर्सची सलग दुकाने आहेत.
या दुकानामध्ये चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी केली होती. दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.