शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

महानुभवांच्या दक्षिण काशीत माउली मुक्कामी!

By admin | Updated: July 19, 2015 23:35 IST

फलटणमध्ये स्वागत : आळंदीहून निघालेला पालखी सोहळा निम्म्या अंतरावर पोहोचला

फलटण : ज्ञानदेव म्हणे हरिजप करणेतुटेल धरणे प्रपंचाचे...हरिपाठातील ओव्या म्हणत पंढरीच्या विठू दर्शनासाठी आसुसलेला वैष्णवांचा मेळा रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास महानुभवांची दक्षिण काशी असलेल्या फलटणनगरीत मुक्कामासाठी स्थिरावला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ऐतिहासिक प्रभू श्रीरामांच्या फलटणनगरीत आगमन झाले, त्यावेळी सारे शहर ‘ज्ञानोबा माउलीं’च्या जयघोषाने दुमदुमून गेले.पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेला वैष्णवांचा मेळा आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या सोहळ्याने निम्मे अंतर कापले आहे. फलटण शहराच्या सीमेवर जिंती नाक्याजवळ नगराध्यक्षा सारिका जाधव यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे, उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक सोमाशेठ जाधव, नितीन भोसले, सुरेश पवार उपस्थित होते. यावेळी सोहळ्यातील मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिंती नाका येथून माउलींचा रथ मलठण, संत हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक मार्गे ऐतिहासिक मुधोजी मनमोहन राजवाडा व प्रभू श्रीरामांच्या मंदिरासमोर येताच माउलींचे स्वागत राजघराण्याच्या वतीने यशोधराराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. त्यानंतर पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, स्वामी विवेकानंदनगर मार्गे सायंकाळी विमानतळावरील प्रशस्त मुक्कामाच्या ठिकाणी विसावला. याठिकाणी चोपदारांनी हरवलेल्या व सापडलेल्या वस्तूंचे निवेदन केले. काही सूचना केल्यानंतर समाजआरती झाली. त्यानंतर वारकरी आपापल्या मुक्कामाच्या जागेवर रवाना झाले. (प्रतिनिधी)वारकऱ्यांसाठी विविध उपक्रमफलटणमधील नागरिकांनी वारकऱ्यांसाठी घरोघरी भोजनाची सोय केली होती. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे यांनीही चहा-नाष्टा, भोजनाची व्यवस्था केली होती. अनेक मंडळांनी विविध उपक्रम राबवून सेवा केली. मराठी पत्रकार सामाजिक सेवा संस्थेतर्फे भाविकांची मोफत चप्पल, बूट शिवणे, फाटके कपडे शिवणे, मोफत सलून असे उपक्रम राबविण्यात आले. आॅल इंडिया रिपोर्टर असोसिएशनतर्फे भाविकांसाठी मोफत औषधोपचार व आरोग्य तपासणी शिबिर घेतले.