शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

‘मातोश्री’तील आजी-आजोबांना लेकराकडून स्नेहभोजन

By admin | Updated: August 9, 2015 23:42 IST

चेहऱ्यावर तरळले समाधान

सातारा : महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात राहत असलेल्या आजी-आजोबांनी आज लेकरानं दिलेल्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या वृध्दाश्रमात ‘आजी-आजोबा’ दिवस साजरा करताना सुर्व्हेज प्युअर नॉनव्हेज या हॉटेलचे मालक माधव सुर्वे यांनी महिन्यातून एकदा जेवण देण्याचा शब्द दिला होता. त्याचा आज (रविवार) प्रारंभ झाला.साताऱ्यातील युवकांनी ‘आजी-आजोबा दिन’ केक कापून साजरा केला होता. कौटुंबिक कलहामुळे वृद्धाश्रमात विसावलेल्या आजी, आजोबांनी यानिमित्तानं नातवंडांचं प्रेम अनुभवलं होतं. हक्काच्या माणसांनी दुर्लक्षित केलेल्या आणि आपल्या आयुष्याची सायंकाळ वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या आजी-आजोबांचं एकाकीपण दूर व्हावं, त्यांना मायेची सावली मिळावी, या आपलेपणानं माधव सुर्वे यांनी महिन्यातून एकदा आजी-आजोबांना खास मेजवानी देण्याची भावना व्यक्त केली होती. त्यानुसार रविवारी दुपारी साडेबारा वाजता वृद्धाश्रमात सुग्रास भोजन देण्यात आले. बऱ्याच दिवसांनी आपलं असं कोणी भेटल्यानंतर जो आनंद होतो, तसंच समाधान आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. या उपक्रमावेळी हॉटेलचे कॅप्टन शुभम राजेघाडगे, महेश निकम, मातोश्रीचे व्यवस्थापक एस. एम. सागरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)चेहऱ्यावर तरळले समाधानवृद्धाश्रमातील जेवणाच्या हॉलमध्ये सर्वांना एकत्र बसवून त्यांना स्नेहभोजन देण्यात आले. माधव सुर्वे आणि त्यांचे कर्मचारी हे स्वत: आग्रह करून आजी-आजोबांना जेवण वाढत होते. आपल्या घरात, आपल्या माणसांबरोबर बसून जेवण करत असल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते.