शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या चाकाखाली सापडून विवाहितेचा मृत्यू, युवक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:42 IST

भरतगाव येथील घटना

ठळक मुद्देअपघाताची माहिती मिळताच हायवे बीट चारचे सचिन पोळ, पी.सी.शिंदे, बी.आर.नदाफ, बोरगाव पोलीस ठाण्याचे किरण निकम, उत्तम गायकवाड, राहुल भोये, कपिल टीकोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी युवकास उपचारासाठी नागठाणेतील आरोग्य केंद्रात दाखल केले.

नागठाणे: पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी गावच्या हद्दीत दुचाकीला मालट्रकने धडक दिल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली सापडून विवाहितेचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास झाला. सारिका तानाजी मोहिते (वय ३२, रा.नागठाणे ता.सातारा) असे अपघातात ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर वैभव विलास सकटे (वय १९, रा.अंगापूर, ता.सातारा) असे जखमी युवकाचे नाव आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  वैभव सकटे हा शेंद्रे येथून आपली आत्या सारिका मोहिते हिला दुचाकीवरून (क्र.एमएच ११ डीसी ४१५२) नागठाणे येथे सोडण्यासाठी निघाला होता. भरतगाववाडी गावच्या हद्दीत राजमार्ग हॉटेलचे पुढे ते आले. याचवेळी एका शिवशाही बसला चुकीच्या बाजूने मालट्रक चालकाने ओव्हरटेक केले. ट्रक भरधाव वेगात होता. ओव्हरटेक करतच ट्रकने पुढे निघालेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यावेळी दुचाकीवर बसलेली सारिका मोहिते ही महामार्गावर खाली पडली. त्यानंतर मालट्रकच्या चाकाखाली सापडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालक वैभव हाही खाली पडल्यामुळे तो ही गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर अज्ञात मालट्रक चालकाने तेथे न थांबता मालट्रकसह तेथून पलायन केले.

या अपघाताची माहिती मिळताच हायवे बीट चारचे सचिन पोळ, पी.सी.शिंदे, बी.आर.नदाफ, बोरगाव पोलीस ठाण्याचे किरण निकम, उत्तम गायकवाड, राहुल भोये, कपिल टीकोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी युवकास उपचारासाठी नागठाणेतील आरोग्य केंद्रात दाखल केले. याबाबतची तक्रार वैभव सकटे याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ हे करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातsatara-pcसाताराDeathमृत्यूPoliceपोलिस