जाचहाटाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, दोघांवर गुन्हा: फ्लॅट घेण्यासाठी तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:09 IST2019-02-15T14:08:38+5:302019-02-15T14:09:38+5:30
सासरच्या जाचहाटाला कंटाळून धनश्री उमेश टकले (वय ४१, रा. अनुसया अपार्टमेंट, रविवार पेठ, सातारा) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पतीसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

जाचहाटाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, दोघांवर गुन्हा: फ्लॅट घेण्यासाठी तगादा
सातारा : सासरच्या जाचहाटाला कंटाळून धनश्री उमेश टकले (वय ४१, रा. अनुसया अपार्टमेंट, रविवार पेठ, सातारा) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पतीसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
उमेश दत्तात्रय टकले, विमल दत्तात्रय टकले (रा. अनुसया अपार्टमेंट, रविवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहिता धनश्री टकलेचा जाचहाट करण्यात येत होता.
जीवे मारण्याचा प्रयत्न करून तिला घरात कोंडून ठेवले जात होते. या त्रासाला कंटाळून धनश्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तुषार चंद्रकांत कोठावळे (वय ४५, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.