लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 04:19 PM2019-12-12T16:19:53+5:302019-12-12T16:21:26+5:30

पती आजाराने त्रस्त असल्याने माहेरी राहत असलेल्या विवाहितेला लग्न करतो, असे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.

Marriage torture on the bride of the bride | लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार

लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार

googlenewsNext
ठळक मुद्देलग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचारशाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल

सातारा : पती आजाराने त्रस्त असल्याने माहेरी राहत असलेल्या विवाहितेला लग्न करतो, असे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.

शंकर मारुती गोपरेड्डी (वय ३०, रा. आकाशवाणी केंद्राशेजारी, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित महिलेचा पती आजारी आहे. गेल्या काही दिवसांपासून पीडित महिला तिच्या माहेरी राहते. दरम्यान, साताऱ्यात एका ठिकाणी काम करत असताना २०१४ ला पीडित महिलेला शंकर गोपरेड्डी हा तिचा लहानपणीचा मित्र भेटला.

२०१४ पासून त्यांची ओळख वाढत गेली. पती आजाराने त्रस्त असल्याने शंकरने विवाहितेला मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे आमिष दाखवले. पीडितेच्या आईला त्याने तुमच्या मुलीसोबत मी लग्न करणार असल्याचे सांगितले.

आॅक्टोबर महिन्यामध्ये पीडितेला स्वतंत्र खोली घेण्यास त्याने भाग पाडले. या ठिकाणी शंकर वारंवार जात होता. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने तो अत्याचार करत होता. त्याला लग्नाबद्दल पीडितेने विचारल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पीडितेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन शंकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title: Marriage torture on the bride of the bride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.