शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
2
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
3
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
5
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
6
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
7
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
8
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
9
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
10
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
11
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
12
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
13
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
14
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
15
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
16
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
17
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
18
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
19
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
20
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 06:51 IST

मराठी शाळा चालायलाच हवी, कारण उद्याचा ज्ञानेश्वर किंवा तुकोबा याच मराठी शाळांमधून घडणार आहेत, अशा हृदयस्पर्शी आणि जळजळीत शब्दांत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मराठी शाळांच्या अस्तित्वावर बोट ठेवले...

सचिन काकडे -

छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : ‘मी ज्या शाळेत शिकलो, त्या वर्गाचा पट केवळ पाच होता. जर आजच्यासारखे पटसंख्येचे जाचक नियम त्याकाळी असते, तर माझी शाळा कधीच बंद झाली असती आणि मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शाळांची होणारी गळती थांबविणे ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजाचीही नैतिक जबाबदारी आहे. मराठी शाळा चालायलाच हवी, कारण उद्याचा ज्ञानेश्वर किंवा तुकोबा याच मराठी शाळांमधून घडणार आहेत, अशा हृदयस्पर्शी आणि जळजळीत शब्दांत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मराठी शाळांच्या अस्तित्वावर बोट ठेवले.

साताऱ्यातील ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’त शुक्रवारी (दि. २) संमेलनाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मायमराठीची व्यथा आणि प्रशासनाची उदासीनता मांडली. 

शेतकरी आणि लेखकांचे अपयश -केवळ भाषाच नव्हे, तर सामाजिक प्रश्नांवरही विश्वास पाटील यांनी भाष्य केले. बळीराजाच्या आत्महत्यांचे सत्र हे केवळ राजकीय पक्षांचे नव्हे, तर लेखक आणि कलावंतांचेही अपयश आहे, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. शेतकऱ्याच्या मातेचा आणि पत्नीचा सन्मान व्हायला हवा. शासनाने ‘लाडक्या बहिणी’प्रमाणेच ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना राबवून शेतकरी महिलांना बळ द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

लेखक आणि साहित्यापुढील आव्हाने राज्यातील ३६ पैकी २० जिल्ह्यांच्या मुख्यालयात मराठी पुस्तकांचे एकही दुकान नसणे, ही दिवाळखोरी असल्याची खंत विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.  लेखक व प्रकाशकांवर लादलेला १८ टक्के जीएसटी तत्काळ रद्द करावा, असे आवाहन त्यांनी  केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Save Marathi schools; future Dnyaneshwar-Tukaram will emerge here: Patil.

Web Summary : Vishwas Patil highlighted administrative apathy towards Marathi schools, emphasizing their importance in nurturing future saints. He urged support for farmers' wives and mothers, advocating for GST exemption on books and availability in all districts.
टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील literatureसाहित्य