शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची मोदींकडून ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 12:37 IST

फलटण : ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन खासदार उदयनराजे भोसले आणि ...

फलटण : ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन खासदार उदयनराजे भोसले आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सकारात्मक विचार करून यावर तोडगा काढण्याची ग्वाही मोदी यांनी त्यांना दिली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्याच पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. भेटीदरम्यान खासदार उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील आरक्षण परिस्थितीवर चर्चा केली.ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे. सर्व समाजातील समाजघटकांना बरोबर घेऊन जाणार म्हणून ओळखला जाणारा हा समाज आहे; परंतु आता समाजातील मुले-मुली व कुटुंबाची अर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे.समाजातील मुला-मुलींना शिक्षणासाठी फी भरणे अवघड आहे. पालकांना जमीन विकून, बँक व खासगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे. शिक्षण झाल्यानंतर नोकरीची शाश्वती नाही. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती दोन्ही खासदारांनी केली.

धनगर समाजालाही न्याय मिळावा..महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी हा समाज अनेक वर्षे झटत आहे. इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे. परंतु, महाराष्ट्रात शब्दांचा खेळ झाला आहे. महाराष्ट्रात धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही, तरी याबाबत आपण लक्ष घालावे व समाजाला आरक्षण द्यावे, अशी विनंती दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयांवर सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNarendra Modiनरेंद्र मोदीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरMaratha Reservationमराठा आरक्षण