शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

अनेक दुष्काळी गावं बनली श्रीमंत : कोट्यवधी रुपयांची उन्हाळी पिकं हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:55 PM

नितीन काळेल ।सातारा : वॉटर कप स्पर्धा दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरली असून, आता पडलेल्या पावसामुळे माण तालुक्यातील माळरानं आबादानी झाली आहेत. शेततलाव, पाझर तलाव, डीपसीसीटी, नालाबांधात पाणीसाठा झाला असून, विहिरींच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर भांडवलीत पाण्याचे मोठे भांडवल झाले आहे. दुसरीकडे उपलब्ध पाण्यामुळे नगदी उन्हाळी पिके घेतल्याने दुष्काळी ...

ठळक मुद्दे४५ दिवसांच्या श्रमदानामुळे पालटलं रुपडं; माळरानं आबादानी

नितीन काळेल ।सातारा : वॉटर कप स्पर्धा दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरली असून, आता पडलेल्या पावसामुळे माण तालुक्यातील माळरानं आबादानी झाली आहेत. शेततलाव, पाझर तलाव, डीपसीसीटी, नालाबांधात पाणीसाठा झाला असून, विहिरींच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर भांडवलीत पाण्याचे मोठे भांडवल झाले आहे. दुसरीकडे उपलब्ध पाण्यामुळे नगदी उन्हाळी पिके घेतल्याने दुष्काळी भागातील अनेक शेतकरी खऱ्या अर्थाने श्रीमंत झाले आहेत. ४५ दिवसांचं श्रमदान गावांना पाणीदार करून गेले आहे.

राज्यात गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता आमीर खानच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेचे दृश्य परिणाम सध्या दिसू लागले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यावर्षी माण तालुक्यातील ६६ गावे स्पर्धेत उतरली होती. या सर्व गावात जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. तर काही गावांनी उद्दिष्टांपेक्षा अधिक काम केले आहे.

याचा दृश्य परिणाम म्हणजे पाणीसाठा वाढला आहे. यावर्षी मान्सूनने वेळेत हजेरी लावली. माण तालुक्याच्या काही भागात हा पाऊस चांगला झाला. त्यामुळे भांडवली, थदाळे, किरकसाल, श्री पालवन, अनभुलेवाडी, पिंगळी खुर्द भागात पाणी साठले. पाझर तलाव, नालाबांध भरले. तर माळरानावरील सीसीटी, डीपसीसीटी भरल्याने परिसर आबादानी झाला. बनगरवाडीसारख्या गावातील शेततलाव, नालाबांध भरल्याने ओढ्याला पाणी वाहू लागले. विहिरींची पातळी वाढल्याने पिकांना श्वास्वत पाणी मिळालं.वॉटर कपच्या गावांत टँकरला टाटा...उन्हाळ्यात माण तालुक्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागायचा. त्यासाठी गावोगावी टँकरची भिरकीट सुरू असायची. लोकांबरोबरच जनावरांचीही तहान टँकरवर अवलंबून असायची. कधी-कधी तर दोन-तीन दिवस टँकर यायचा नाही. त्यामुळे लोकांना पाणी कमी प्रमाणात वापरावे लागायचे. पण, वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांनी यावर्षीपासून टँकरला टाटा केला आहे. गेल्यावर्षी स्पर्धेंतर्गत जलसंधारणाची कामे झाल्याने पावसाळ्यात पाणीसाठा झाला होता. त्यामुळे कारखेल, थदाळे, बिदाल, किरकसाल, पिंगळी खुर्द, काळेवाडी, जाशी, दिवडी आदी गावांत यावर्षी उन्हाळ्यात टँकरही फिरकला नाही. या गावांनी पाणीसाठा केल्याने हे चित्र बदलले आहे.कांदा, वाटाणा, डाळिंब, कलिंगडातून ५० कोटींपर्यंत उड्डाणजलसंधारणामुळे उन्हाळ्यातही पाणी आहे. या पाण्यावर कांदा, वाटाणा, कलिंगड, ऊस, पालेभाज्या, डाळिंब आदी घेण्यात येत आहे. बिदाल, थदाळे, कारखेल, किरकसाल, परकंदी आदी गावांतून सुमारे ५० कोटींपर्यंत शेती उत्पादन निघाले आहे. बिदालमध्ये तर सुमारे १५ कोटींचा कांदा विकण्यात आला असून, २० कोटींचा कांदा शिल्लक आहे. तर परकंदीत वाटाणा, कांद्यातून दीड ते दोन कोटी रुपये शेतकºयांनी मिळविले आहेत. कारखेलला डाळिंब, कलिंगडातून ३ कोटींवर उत्पन्न मिळाले आहे. 

वॉटर कपमुळे माण तालुक्यात जलसंधारणाचे मोठे काम उभे राहिले आहे. यामुळे शेतकºयांना श्वास्वत पाणी उपलब्ध झाले आहे. यावर्षी अनेक गावांतील शेतकºयांनी उन्हाळ्यात पिके घेतली. त्यातून ४० ते ५० कोटी रुपये शेतकºयांच्या हाती आले आहेत. वॉटर कप स्पर्धा तालुक्याला वरदान ठरली आहे.- अजित पवार, समन्वयक पाणी फाउंडेशन