शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यावरील परसबागेतील आमराई मोहराने फुलली, मान्याचीवाडी ग्रामस्थांचा अनोखा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:15 IST

रवींद्र माने ढेबेवाडी : गाव परिसरातील शेकडो वर्षांच्या जुन्या वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच नवीन वृक्षलागवड करुन मान्याचीवाडी गावाने वृक्षसंपदेचे जतन केले ...

रवींद्र मानेढेबेवाडी : गाव परिसरातील शेकडो वर्षांच्या जुन्या वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच नवीन वृक्षलागवड करुन मान्याचीवाडी गावाने वृक्षसंपदेचे जतन केले आहे. गावातील सांडपाण्यावर लावलेल्या परसबागांमध्ये लागवड केलेल्या आंब्याच्या बागा मोहराने फुलल्या आहेत. यावर्षी आंब्याचे विक्रमी उत्पन्न मिळेल, असा विश्वास येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला.काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाचा फटका बसू लागल्याने मान्याचीवाडी येथील काही शेतकऱ्यांनी बांधावर तर काहींनी शेतात फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. बहुतेक शेतकऱ्यांनी गाव परिसरात वाहून जाणाऱ्या सांडपाण्याचा पुर्नवापर करण्याचा निर्धार केला.त्यानुसार आंबा, चिक्कू, शेवगा, लिंबू, साग, फणस आदी फळझाडांची निवड केली. त्यासाठी गावातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या गटाराच्या बाजूला असलेल्या शेतजमिनीची निवड केली. त्यामध्ये ही वृक्षलागवड केली. घरातील आंघोळीचे, धुण्या-भांड्याचे बंदिस्त गटारांच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी थेट या झाडांना न देता गटारमध्ये स्क्रिनिंग चेंबर घेऊन शुद्ध पाणी बागेतील फळझाडांना दिले.गावातील सांडपाणी कुठेही ओढ्याला अथवा नदीला न सोडता त्याचा पुनर्वापर करत येथील शेतकऱ्यांनी परसबागा फुलवल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडलीच शिवाय सांडपाण्यापासून होणारे प्रदूषण टाळण्यासही मदत झाली. सांडपाण्यावर आणि सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादित केलेल्या येथील आंबा, चिक्कू आणि लिंबू या फळांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे येथील शेतकरी सांगतात.यावर्षी चिक्कूही मोठा भाव खाऊन गेला, तर येणारा आंबा हंगाम भरभराट करून जाईल, असा अंदाज असून, सांडपाण्यावर तयार केलेल्या परसबागा मोहराने फुलल्या आहेत.

विजेशिवाय वृक्ष जतनगावातील सांडपाणी बंदिस्त गटाराद्वारे दोन ठिकाणी वाहून जाते. त्याच मार्गावर या फळबागांचे नियोजन केले आहे. तेथे शेतकरी आपापल्या बागांना आळीपाळीने पाणी देतात. त्यामुळे विजेशिवाय वृक्षलागवडीचा यशस्वी प्रयोग मान्याचीवाडीत यशस्वी झाला आहे.

माझी वसुंधरा अभियानातही वृक्षलागवड...ग्रामस्थांनी दिवंगतांच्या स्मरणात तसेच महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण तसेच नवदाम्पत्यांनी नवीन संसाराची सुरुवात वृक्षारोपणाने करावी, असे नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी केले आहेत. यावर्षी माझी वसुंधरा अभियानांतर्गतही बांधावरची वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

सांडपाणी हे आरोग्यासाठी धोकादायक असते. त्याची विल्हेवाट न लावल्यास प्रदूषण होऊन साथीच्या आजारांचा फैलाव होऊ शकतो. यासाठी प्रत्येक गावाने सांडपाण्याचे नियोजन तसेच त्यासाठी भूमिगत गटार व्यवस्था करायला हवी. सांडपाण्याचा पुनर्वापर केला तर उत्पन्नही मिळू शकते. - दिलीप गुंजाळकर, माजी उपसरपंच, मान्याचीवाडी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर