शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: भोंदू मांत्रिकाकडं आलिशान कार अन् गळाभर सोनं!, इंदापूरच्या मंगेश भागवत याचे बरेच कारनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:41 IST

लुटीतून त्यानं उभारलं साम्राज्य; म्हसवड पोलिस कारवाई करणार का?

सातारा: पैशांचा पाऊस पाडून देतो, असे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या मंगेश भागवत या मांत्रिकाचे बरेच कारनामे समोर येत आहेत. त्याच्याकडे आलिशान कार आहे तर गळाभर सोनं घालून तो लोकांना इंप्रेस करायचा. अनेकांना लुबाडून त्याने अनेक ठिकाणी प्लाॅट खरेदी केल्याचेही तक्रारदारांचे म्हणणे आहे. यातून त्याने मोठं साम्राज्य उभं केलं असून, म्हसवड पोलिस त्याचे हे लुटीचे साम्राज्य उद्ध्वस्त करणार का, याकडे माण तालुक्यासह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.माण तालुक्यातील देवापूर येथील कांता बनसोडे (वय ६०) यांच्यासह पाचजणांना भोंदू मांत्रिक मंगेश भागवत आणि सर्जेराव वाघमारे यांनी तब्बल ३६ लाखांना गंडा घातल्याचे समोर आले होते. या मांत्रिकावर म्हसवड पोलिस ठाण्यात जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अद्यापही म्हसवड पोलिसांनी अटक केली नाही. लोकांना लुटण्यासाठी मांत्रिक मंगेश भागवत याने पैशांच्या पावसाचे आमिष दाखविले. लूट केलेल्या पैशांतून त्याने मोठे साम्राज्य उभं केलं असल्याचे तक्रारदार सांगत आहेत.त्याच्याकडे आलिशान कार आहे. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी प्लाॅटसुद्धा त्याच्या नावावर आहेत. लोकांना इंप्रेस करण्यासाठी गळाभर सोनं घालून तो मिरवत असतो. तो श्रीमंत्र असल्याचा आव आणून लोकांसमोर येत असल्याने नक्कीच तो पैशांचा पाऊस पाडत असणार, असा विश्वास लोकांचा बसत होता. त्यामुळेच त्याच्या भूलथापांना बळी पडून अनेकांनी त्याच्याकडे पैसे गुंतविल्याचे बोलले जात आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हसवड पोलिसांनी तातडीने हालचाली करून त्याला पकडणे गरजेचे आहे. त्याने आणखी कोणा-कोणाला अशा प्रकारे गंडा घातला, हे तेव्हाच समोर येईल. त्यातून त्याने नेमकी कोठे संपत्ती खरेदी केली. याचीही माहिती उघड होईल. या प्रकरणामध्ये मोठे रॅकेट असण्याचा संशय अंधश्रद्धा निर्मूलनच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा व्यक्त केली आहे.

अनेक तक्रारदार बघ्याच्या भूमिकेत..भोंदू मांत्रिकाने अनेकांना गंडा घातला आहे. मात्र, समाजात आपली बदनामी होईल म्हणून कोणी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. तर भोंदू मांत्रिकांकडूनही दमदाटी केली जात होती. या भीतीनेही अनेक तक्रारदार बघ्याच्या भूमिकेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी