शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

फलटण- बारामती रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी आता सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 16:34 IST

लोणंद- फलटण- बारामती हा ६३ किमीचा रेल्वे मार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा अत्यंत जवळचा व रेल्वेला अतिशय फायदेशीर ठरणारा रेल्वे मार्ग

फलटण : बऱ्याच वर्षांपासून रंगाळलेल्या फलटण ते बारामतीरेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना काहीजण जमीन देण्यास विरोध करत आहेत. या जमिनी सक्तीने संपादन करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्याप्रमाणे बारामती तालुक्यात याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.लोणंद- फलटण- बारामती हा ६३ किमीचा रेल्वे मार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा अत्यंत जवळचा व रेल्वेला अतिशय फायदेशीर ठरणारा रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग होण्यासाठी दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी १९९८ साली या मार्गाला मंजुरी मिळवली. हा मार्ग रेल्वेच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने तो व्हावा म्हणून रेल्वे विभागसुद्धा प्रयत्नशील आहे.लोणंद ते फलटण या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होऊन या मार्गावर प्रत्यक्ष रेल्वे सुरू झालेली आहे. मात्र, फलटण ते बारामती रेल्वे मार्गाचे रखडलेले काम नवीन प्लॅननुसार सुरू करण्यात आले. याला बारामती तालुक्यातील लोकप्रतिनिधी व ज्यांच्या जमिनीतून मार्ग जाणार आहे त्यांनीसुद्धा परवानगी दिल्याने फलटण ते बारामती रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम तातडीने सुरू करण्यात आले.फलटण तालुक्यातील भूसंपादन पूर्ण होत असताना बारामती तालुक्यातील जवळपास ८५ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, काहींनी पुन्हा विरोध सुरू केल्याने सध्या काम थंडावले आहे. या मार्गासाठी आतापर्यंत १३१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. यापैकी संपादन न झालेल्या ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हा प्रशासनाने रेल्वे प्रशासनाकडे दिल्याची माहिती समोर येत आहे.या सक्तीच्या संपादनासाठी बारामती प्रांताधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला प्रस्ताव दिला आहे. यासाठी त्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे. लवकरच भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावर प्रत्यक्ष लाइन टाकून फलटण ते बारामती रेल्वे सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासन उत्सुक आहे.

फलटण ते बारामती आणि फलटण ते पंढरपूर या रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम तातडीने मार्गी लागावे, म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतीच रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने गतीने भूसंपादनाचे काम सुरू केले आहे.१७६ पैकी १२१ हेक्टर जमिनीचे संपादनरेल्वे मार्गापैकी एकूण ३७.२० किमी रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जातो. या प्रकल्पासाठी बारामती तालुक्यातील काही गावांमधील खासगी जागा संपादित करण्याची प्रक्रिया पार पडली आहे. या मार्गासाठी १७६ हेक्टरपैकी १२१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे, तर काही दिवसांत ९.६८ हेक्टर एवढ्या जमिनीची खरेदी होईल. त्यामुळे १३१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे, असे म्हणता येईल. मात्र, बाकी ४० हेक्टर क्षेत्र संपादन करण्यासाठी तेथील नागरिकांकडून विरोध होत असल्यामुळे ही जमीन सक्तीने संपादन करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणBaramatiबारामतीrailwayरेल्वे