शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

आता विरोधकांची 'दांडी' कशी उडवायची ते बघतो, उदयनराजे भोसले यांचा इतिहास

By प्रमोद सुकरे | Updated: April 11, 2024 09:12 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीच्या (Mahayuti) सगळ्या 'दांड्या' व्यवस्थित आहेत. तुम्ही उगाच काळजी करू नका. आता विरोधकांची 'दांडी' कशी उडवायची ते आम्ही बघतो असे मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केले.

- प्रमोद सुकरेकराड - महायुतीच्या सगळ्या 'दांड्या' व्यवस्थित आहेत. तुम्ही उगाच काळजी करू नका. आता विरोधकांची 'दांडी' कशी उडवायची ते आम्ही बघतो असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वी कराड येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी दांडी मारली होती. त्याबाबत माध्यमांनी छेडले असता उदयनराजेंनी वरील प्रमाणे उत्तर दिले.

कराड येथे बुधवारी सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ.अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, अँड.भरत पाटील, सुनील काटकर, राजेंद्र यादव, पैलवान धनाजी पाटील, एकनाथ बागडी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 जरंडेश्वर साखर कारखाना आपण खाजगी होऊ देणार नाही अशी गर्जना केली होती? त्याकडे लक्ष वेधले असता खासदार भोसले म्हणाले, काँग्रेसच्या काळात खिरापत वाटल्यासारखे साखर कारखाने वाटले गेले. त्यामुळे ऊस काळपाचा व अनेक प्रश्न कारखानदारांच्या समोर उभे होते. त्यातून व्यवस्थापन कोलमडले. परिणामी असे कारखाने खाजगी झाले. त्यापैकी जरंडेश्वर हा एक आहे हे तुम्ही समजून घ्या.

लोकसभा निवडणुकीसाठी व प्रचारासाठी आता वेळ थोडा आहे. मतदारसंघ मोठा आहे सुमारे २ हजार ३०० गावे अन नगरपालिका, नगरपंचायती यांचा मतदारसंघात समावेश आहे. त्यामुळे कमी वेळेत सर्व मतदारांच्या पर्यंत पोहोचणे अवघड बनले आहे. पण केंद्र सरकारचे काम घराघरापर्यंत पोहोचले असून विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचे खासदार भोसले म्हणाले.

भाजपा संविधान विरोधी वाटतो का? याबाबत विचारले असता असं कोण म्हणतंय? असा प्रश्न त्यांनीच केला. तसेच भाजपचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी मिळते जुळते आहे असे सांगत भाजप हा जातीवादी पक्ष नाही असेही खासदार भोसले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

होय मी उमेदवार म्हणूनच बोलतोय !तुमचा आजचा माध्यमांशी होत असणारा संवाद हा भाजपचे नेते, राज्यसभा खासदार की लोकसभा उमेदवार म्हणून होत आहे? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी सुरुवातीलाच खासदार भोसले यांना केला. त्यावर क्षणभर थांबून 'होय मी उमेदवार म्हणूनच बोलतोय!' असे ते म्हणाले. त्यावर भाजपच्या १० उमेदवारी याद्या जाहीर झाल्या पण तुमचं नाव त्यात दिसत नाही. याकडे लक्ष वेधले असता 'पक्ष मोठा आहे. उशीर झाला असला तरी नाव लवकरच जाहीर करेल असेच त्यांनी सांगितले. पण जर उमेदवारी मिळालीच नाही तर बंडखोरी करणार का? असा प्रश्न करताच उमेदवारी मिळणार नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं? असा प्रतिप्रश्न खासदार भोसले यांनी यावेळी केला.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेsatara-pcसाताराBJPभाजपाMahayutiमहायुतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४