Maharashtra CM : काका की पुतण्या?... साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या तीन आमदारांचं 'ठरलं'!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 02:43 PM2019-11-23T14:43:47+5:302019-11-23T14:46:28+5:30

पवारांनी साताऱ्यातूनच राष्ट्रवादीच्या झंझावाती प्रचाराची सुरूवात आणि राजकारण बदलणारी  सभाही घेतल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलासा मिळाला होता.

Maharashtra CM: Ramraje Naik Nimbalkar has said that all three MLAs from Satara will be with Sharad Pawar. | Maharashtra CM : काका की पुतण्या?... साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या तीन आमदारांचं 'ठरलं'!

Maharashtra CM : काका की पुतण्या?... साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या तीन आमदारांचं 'ठरलं'!

Next

सातारा -  सातारा जिल्हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी राहिला आहे. तर पवारांनी साताऱ्यातूनच राष्ट्रवादीच्या झंझावाती प्रचाराची सुरूवात आणि राजकारण बदलणारी  सभाही घेतल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलासा मिळाला होता. शरद पवारांचाच हा करिष्मा असल्यामुळे जिल्ह्यात निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही आमदार शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहेत. तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. 

वाई मतदारसंघातून निवडून आलेले मकरंद पाटील, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील आणि फलटणमधून दीपक चव्हाण हे तीघेही शरद पवार यांच्याच सोबत आहेत. हे सर्व आमदार सकाळीच मुंबईकडे रवाना झाले असून शरद पवार जी भूमिका घेतील त्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

अजित पवार परत येऊ शकतात, भाजपाने त्यांना 'ब्लॅकमेल' केलं; संजय राऊत 'प्रचंड आशावादी'

विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. या बदलत्या राजकीय परिस्थितीबाबत आपण कोणतेही मत मांडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दीपक चव्हाण हे शरद पवारांसोबत असले तरी रामराजेंच्या भूमिकेनंतर त्यांचीही भूमिका बदलू शकते. 

मी पुन्हा येईन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असे बोला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

गेल्या काही वर्षात अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण, माजी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्यातील वादामुळे त्यांनी जिल्ह्यातील आपला हस्तक्षेप कमी केला. तरीही त्यांना मानणारा एक गट जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. पण, शरद पवारांना डावलून तो अजित पवारांसोबत जाऊ इच्छित नाही. ज्यांना पक्षांतर करायचे होते त्यांनी राष्ट्रवादी निवडणूकी अगोदरच सोडली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वातावरण सध्या शरद पवार यांच्या बाजूनेच आहेत.  

'अमित शाह-देवेंद्र फडणवीस शरद पवारांना पटवतील अन् तेही एनडीएमध्ये येतील'

दुसऱ्या बाजूला पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेली पंधरा दिवस पक्षांतर करून आपण चूक तर केली नाही ना असे मत तयार झालेल्या आमदारांना आता मंत्रीपदी वर्णी लागणार अशी आशा वाटू लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर साताऱ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि साखर वाटून आनंद व्यक्त केला.

Web Title: Maharashtra CM: Ramraje Naik Nimbalkar has said that all three MLAs from Satara will be with Sharad Pawar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.