शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
4
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
5
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
6
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
7
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
8
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
9
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
10
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
11
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
12
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
14
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
15
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
16
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
17
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
18
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
19
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
20
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी सोशल मीडिया इन्फ्लुवेन्सर आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:22 IST

सातारा : पत्रके, जाहीर सभा, कोपरासभा प्रभातफेरी या सर्वां इतकच सध्या सोशल मीडियावर रिल्स विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना थेट मतदारांपर्यंत ...

सातारा : पत्रके, जाहीर सभा, कोपरासभा प्रभातफेरी या सर्वां इतकच सध्या सोशल मीडियावर रिल्स विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याची नामी संधी उपलब्ध करून देत आहे. स्थानिक रिल्स स्टार्सला सोबत घेऊन कोलाब्रेशनमध्ये रिल करून सोशल मीडियावर या उमेदवारांचा प्रचार जोरकसपणे सुरू झाला आहे.पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काही लढती लक्षवेधी आहेत त्यातील प्रमुख उमेदवारांची प्रचार यंत्रणा सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. दिवसभरात उमेदवारांनी केलेल्या संपर्क दौऱ्याबरोबरच मतदारांना भावेल अशा विकासकामांच्या रिलीज करण्याकडे उमेदवारांचा कल दिसतो. व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून या रिल्स स्टारसोबत रिल्स करून त्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील आहेत.

ट्रॉलरचाही घेतला जातोय समाचारकमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया अत्यंत प्रभावशाली माध्यम राजकीय नेत्यांना वाटत आहे. मात्र, त्याचा वापर काही उमेदवार विरोधकांची प्रतिमा मलीन करण्यासाठी करत आहेत. या ट्रॉलधाडीकडे लक्ष देण्यासाठी व त्यांचा समाचार घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे.

स्थानिक इन्फ्लुएन्सरला संधीआपल्या भागातील प्रश्नांबाबत जाण असल्यामुळे उमेदवार स्थानिक सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरला आपल्या प्रचारामध्ये सामावून घेत आहेत. विकासकामांच्या आधारावर व्हिडिओ करून ते समाजमाध्यमांवर अपलोड करून त्याद्वारे मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी यामुळे मिळते. स्थानिक इन्शुरन्सरचे असलेले लाखो फॉलोवरपर्यंत पोहोचण्यासाठी हे माध्यम उमेदवारांना अधिक भावले आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना यंदा आपल्या भागातील उमेदवारांचे काम दर्शविण्याची संधी मिळाली आहे स्थानिक पातळीवर नेटिझन्सला काय बघायला आवडते याचा अभ्यास असल्यामुळे कन्टेन्टविषयी उमेदवाराला फार चर्चा करावी लागत नाही स्थानिकांना यात समाविष्ट करून घेतल्यामुळे थेट मतदारांपर्यंत पोहोचायला उमेदवारांना तयार प्लॅटफॉर्म मिळत आहे. - रमाकांत देशपांडे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराSocial Mediaसोशल मीडियाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024