शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी सातारा जिल्ह्यात दाखल २७९ अर्जांपैकी १९८ अर्ज वैध, माघारीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 15:35 IST

नावात साधर्म्य असलेल्या अर्जावर आक्षेप

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतून २१५ उमेदवारांची २७९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. बुधवारी या अर्जांची प्रशासकीय छाननी झाली. यामध्ये १९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले; तर ८१ अर्ज अवैध ठरले. अर्जमाघारीची मुदत नोव्हेंबरपर्यंत असून त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी ३२ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल केले होते. छाननीत २७ अर्ज वैध ठरले तर ५ उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.पाटण विधानसभा मतदारसंघासाठी दाखल अर्जांच्या छाननीत स्मितादेवी देसाई यांच्यासह अन्य तीन अपक्ष उमेदवार असे चार उमेदवारी अर्ज अवैध ठरले. २२ पैकी १८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.फलटण मतदारसंघात दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले; तर २६ जणांचे अर्ज वैध ठरले. प्रमुख तीन उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जांवर हरकती घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात तब्बल तीन तास सुनावणी सुरू होती. अखेर तिन्ही प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

कऱ्हाड उत्तरमध्ये २८ उमेदवारांकडून दाखल झालेल्या ३१ नामनिर्देशन पत्रांपैकी २७ नामनिर्देशनपत्रे वैध ठरविण्यात आली; तर एक अवैध ठरवण्यात आले आहे.कऱ्हाड दक्षिणेतून २२ उमेदवारांकडून दाखल २८ नामनिर्देशन पत्रांपैकी दोन अपक्षांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरविण्यात आली आहेत, तर २० अर्ज वैध ठरले.

सातारा मतदारसंघात एकूण १९ जणांचे २७ अर्ज दाखल झाले होते. यांपैकी ३ अर्ज छाननीत बाद झाले तर १८ अर्ज वैध ठरले. १ ठिकाणी अर्ज माघारी घेण्यात आला.माण विधानसभा मतदारसंघातील ३ उमेदवारांचे ५ उमेदवारी अर्ज आज छाननीमध्ये बाद झाले. सोनिया जयकुमार गोरे यांचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला. आमदार जयकुमार गोरे यांचा मुख्य अर्ज वैध झाल्यामुळे सोनिया गोरे यांचा अर्ज छाननीत बाद झाला. एकूण ३३ अर्ज वैध ठरले.

वाई मतदारसंघासाठी एकूण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत सर्व २८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

नावात साधर्म्य असलेल्या तिघांच्या अर्जावर आक्षेपअन्य नामसाधर्म्य असलेल्या तीन उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले होते. वकिलांनी त्यासाठी जोरदार युक्तिवाददेखील केला. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी सर्व आक्षेप फेटाळत तिन्ही अर्ज वैध ठरविले. सुमारे तीन तास ही प्रक्रिया चालली होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराkoregaon-acकोरेगावpatan-acपाटणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024