शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीतून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी

By नितीन काळेल | Updated: October 24, 2024 20:35 IST

पहिली यादी जाहीर : कोरेगावात दोन शिंदेंमध्येच सामना; कऱ्हाड उत्तरवरही शिक्कामोर्तब 

सातारा : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली असून कोरेगावमधून आमदार शशिकांत शिंदे यांना तर कऱ्हाड उत्तर मतदारसंघासाठी बाळासाहेब पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोरेगावमध्ये आता दोन शिंदेंमध्येच निकराचा सामना होणार हे स्पष्ट झालेले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटपाचं सूत्र अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. तरीही उध्दवसेनेने बुधवारी ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरूवारी सायंकाळी ४५ उमेदवार जाहीर केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. कोरेगाव मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. शशिकांत शिंदे हे कोरेगावमधून सलग चाैश्यांदा रिंगणात असणार आहेत. तर विरोधात शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे आहेत. मागील निवडणुकीत महेश शिंदे यांच्याकडून शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा दोघे समोरासमोर येणार आहेत.

कऱ्हाड उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादीने पुन्हा आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. याठिकाणी महायुतीतून कोण उतरणार हे स्पष्ट नाही. भाजप तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट हा मतदारसंघ मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. वादातील मतदारसंघ कोणाकडे जातो यावरच या मतदारसंघातील लढत ठरणार आहे.

काॅंग्रेसच्या यादीत कऱ्हाड दक्षिणचे नाव जाहीर होणार...महाविकास आघाडीतील उध्दवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे. आता काॅंग्रेसची यादी येणे बाकी आहे. काॅंग्रेसच्या पहिल्या यादीतच कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव जाहीर होईल असे सांगण्यात येत आहे. तर आतापर्यंत महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील तीन उमेदवार जाहीर झालेले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन आणि उध्दवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४koregaon-acकोरेगावkarad-north-acकराड उत्तरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी