साताऱ्यात महामानवास अभिवादन, गावोगावी भीमज्योतीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:02 IST2018-04-14T14:00:19+5:302018-04-14T14:02:46+5:30

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त साताऱ्यासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आले. साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भीमज्योत प्रज्वलित करून गावोगावी नेली जात होती. भीमज्योतीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

Mahamavanav greetings in Satara, departing from village Bhimjoyi | साताऱ्यात महामानवास अभिवादन, गावोगावी भीमज्योतीचे प्रस्थान

साताऱ्यात महामानवास अभिवादन, गावोगावी भीमज्योतीचे प्रस्थान

ठळक मुद्देसाताऱ्यात महामानवास अभिवादनगावोगावी भीमज्योतीचे प्रस्थान

सातारा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त साताऱ्यासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आले. साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भीमज्योत प्रज्वलित करून गावोगावी नेली जात होती. भीमज्योतीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.



साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मध्यरात्री बारा वाजता अनेकांनी अभिवादन केले. खासदार उदयनराजे भोसले यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरात चौकाचौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, पुतळ्याची प्रतिष्ठापना करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ध्वनीक्षेपकावर भीमगीते लावली होती.

भीमज्योत ही तरुणांना नेहमीच प्रेरणा देत असते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या असंख्य तरुणांनी भीमज्योत साताऱ्यातून आपापल्या घरी घेऊन जात आहेत. यावेळी वाहनांवर झेंडे लावले होते.

Web Title: Mahamavanav greetings in Satara, departing from village Bhimjoyi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.