महाबळेश्वरला पोहण्याची अ‍ॅलर्जी : धक्कादायक चित्र--लोकमत विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:44 AM2018-04-03T00:44:12+5:302018-04-03T00:44:12+5:30

महाबळेश्वर : ‘टाक मुटका... मार सुळका...’ असे शब्द पोहणाऱ्यांच्या तोंडी नेहमीच ऐकू येतात.

 Mahabaleshwar Swiming Allergy: Shocking Picture - Lokmat Special | महाबळेश्वरला पोहण्याची अ‍ॅलर्जी : धक्कादायक चित्र--लोकमत विशेष

महाबळेश्वरला पोहण्याची अ‍ॅलर्जी : धक्कादायक चित्र--लोकमत विशेष

Next
ठळक मुद्दे८० टक्के मुला-मुलींना पाण्याची भीती; पोहण्यासाठी कसलीच सुविधा नसल्याने समस्या

सचिन काकडे ।
महाबळेश्वर : ‘टाक मुटका... मार सुळका...’ असे शब्द पोहणाऱ्यांच्या तोंडी नेहमीच ऐकू येतात. प्रामुख्याने ग्रामीण भागात हे शब्द आजही प्रचलित आहेत. मात्र, महाबळेश्वर याला अपवाद ठरू पाहत आहे. कारण, शहरातील तब्बल ८० टक्के मुला-मुलींना पोहताच येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, यामध्ये १० ते २० वयोगटांतील मुलांची संख्या सर्वाधिक आहे.
पोहणे हा उत्कृष्ट व्यायाम आहे. पोहताना शरीराचे सर्व स्नायू काम करतात. मन आनंदी राहते, झोपेची गुणवत्ता सुधारते, शरीराला
थंडावा मिळतो, स्नायू बळकट
होतात. पोहता येणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर मानले जाते. मात्र, सर्वच बाबतीच प्रगत असलेल्या महाबळेश्वरातील अनेक शाळकरी मुला-मुलींना पोहताच येत नाही.
महाबळेश्वरची भौगौलिक परिस्थिती या सर्व बाबींना काही प्रमाणात कारणीभूत असावी, असे मत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. चार ते पाच महिने पडणाºया पावसामुळे घरातून बाहेर पडणे मुश्कील असते. अशावेळी पोहण्याचा प्रश्नच येत नाही. यानंतर तीन महिने कडाक्याची थंडी. उन्हाळ्यात येथील शाळांना सुटी नसते. त्यामुळे मुलांना पोहण्यासाठी फारसा वेळ देता येत नाही. त्यातच शहरात पूर्वीपासूनच पोहण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेकांना इच्छा असूनही पोहता येत नाही.
दुसरीकडे ज्या मुलांना पोहता येते त्यांनी आपल्या पै-पाहुण्यांच्या गावी अथवा जिथे व्यवस्था आहे, अशा ठिकाणी पोहण्याचे धडे गिरविले आहे. पाचगणीतील काही शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांना पोहणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोहता येत नसल्याने शहरातील काही युवक व नागरिकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना आजपर्यंत अनेकदा घडल्या आहेत. असे असताना पालक व मुले पोहण्यापासून आजही चार हात लांब आहेत. ही बाब अत्यंत
गंभीर असून, प्रशासनाने मुलांसाठी जलतरण तलाव खुला करणे गरजेचे बनले आहे.


एकमेव तलाव १३ वर्षांपासून धूळखात
महाबळेश्वर पालिकेच्या वतीने शहरात जलतरण तलावाची उभारणी करण्यात आली. १२ जून २००४ रोजी या तलावाचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. काही काळ उपयोगात आल्यानंतर हा तलाव बंद पडला. गेल्या १३ वर्षांपासून वापराविना असलेल्या या तलावाला आता झुडपांनी वेढले आहे. पालिकेच्या वतीने डागडुजी केल्यास तो पुन्हा उपयोगात येऊ शकतो, असे मत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

पोहण्याची खूप इच्छा होती; परंतु पोहायचे कोठे हेच समजत नव्हते. शहरातील अनेक हॉटेलमध्ये जलतरण तलाव आहेत. मात्र, या ठिकाणी पोहायला शिकणे अशक्य होते. त्यामुळे महाबळेश्वरजवळ असलेल्या लिंगमळा धबधब्याच्या डोहात पोहायला शिकलो. मात्र, शेकडो मुलांना आजही पोहता येत नाही.
- राहुल आरडे, युवक

Web Title:  Mahabaleshwar Swiming Allergy: Shocking Picture - Lokmat Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.