जपानच्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी अभ्यासली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी

By सचिन काकडे | Published: February 8, 2024 12:01 PM2024-02-08T12:01:18+5:302024-02-08T12:01:58+5:30

गहू गेरवा संशोधन केंद्राला भेट देऊन घेतली माहिती

Mahabaleshwar strawberry studied by Japanese experimental farmers | जपानच्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी अभ्यासली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी

जपानच्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी अभ्यासली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी

सातारा : जपानमधील एम-टू लाबो अग्रिनोव्हेशन या संस्थेच्या काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी बुधवारी महाबळेश्वरच्या गहू गेरवा संशोधन केंद्राला भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी गव्हाबरोबरच स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरीच्या विविध जाती, लागवडीची पद्धत, प्रगत तंत्रज्ञान, वातावरण आदींची माहिती जाणून घेतली.

महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असले तरी या शहराला ‘स्ट्रॉबेरी लँड’ ही भौगोलिक ओळख प्राप्त झाली आहे. देशात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक ८० टक्के उत्पादन हे एकट्या महाबळेश्वर तालुक्यात होते. स्ट्रॉबेरी पिकात दररोज नवनवे संधोधन केले जात असून, हे संशोधन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरू लागले आहे. बुधवारी सकाळी जपानमधील एम-टू लाबो अग्रिनोव्हेशन या संस्थेचे युरिको काटो, योशितो दिनावा या प्रयोगशील शेतकऱ्यांनी महाबळेश्वरमधील गहू गेरवा संशोधन केंद्रास भेट दिली. 

जपानमध्ये गेल्या चार दशकांपासून स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. स्ट्रॉबेरीच्या काही जापनीस जातींना महाबळेश्वरचे वातावरण पोषक ठरू शकते का? याची माहिती या शेतकऱ्यांनी जाणून घेतली. उद्यानविद्याचे सहायक प्राध्यापक डॉ. दर्शन कदम यांनी या शेतकऱ्यांना महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, विविध जाती, लागवडीची पद्धत, नवीन तंत्रज्ञान आदींची इत्थंभूत माहिती दिली, तर वनस्पती विकृतीशास्त्राचे सहायक प्राध्यापक डॉ. विक्रांत साळी यांनी गहू गेरवा संशोधनाची माहिती दिली. स्ट्रॉबेरीतील संशोधन कार्यात काम करण्याची इच्छा यावेळी परदेशी शेतकऱ्यांची व्यक्त केली.

Read in English

Web Title: Mahabaleshwar strawberry studied by Japanese experimental farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.