शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

सातारा: महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस, कोयना धरणात ९७ टीएमसी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 16:59 IST

कोयना धरणातून १९,४७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी यावर्षी महाबळेश्वरचा पाऊस पाच हजार मिलीमीटरजवळ पोहोचलाय. तर नवजाला ४२८८ आणि कोयनानगर येथे ३६५७ मिलीमीटर झाला आहे. दरम्यान, धरणांतील साठा वाढत असून, कोयनेत ९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.यावर्षी जूनच्या अखेरीस खऱ्या अर्थाने पावसाळ्यास सुरुवात झाली. पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला. तर पश्चिम भागात जुलै सुरू झाल्यापासून सलग १५ दिवस धो-धो पाऊस कोसळत होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याचबरोबर प्रमुख धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात साठा वाढला. मात्र, १५ जुलैनंतर पावसाचा जोर कमी झाला. ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. सलग १० दिवस पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला.गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६९ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला ५० आणि महाबळेश्वर येथे ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात ९७.०७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणाचे सहा दरवाजे तीन फुटांवर स्थिर असून, त्यातून १९,४७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे सर्व पाणी कोयना नदीत जात आहे.

प्रमुख धरणांतील विसर्ग असा...

जिल्ह्याच्या पश्चिम भागातच प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे. गुरुवारी सकाळी धोममधून एकूण १३६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर कोयनेतून २१,५७६ क्युसेक, कण्हेर धरण ५५०, उरमोडी २९३३, तारळी ७८०, बलकवडी ९१९ आणि वीर धरणातून १५ हजार १३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान