शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी घेतली उद्धवसेनेचे शेखर गोरेंची भेट; आघाडी धर्म पाळणार की दुसरा निर्णय घेणार?

By नितीन काळेल | Updated: April 15, 2024 19:04 IST

गोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार

सातारा : माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापत चालले असून, भाजपाचे उमेदवार व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी उद्धवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांची भेट घेतली. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगानेच चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे गोरे आघाडी धर्म पाळणार की दुसरा निर्णय घेणार ? हे लवकरच समोर येणार आहे.   माढा मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातच प्रमुख लढत होणार आहे. भाजपाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीकडून भाजपामधून आलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच धैर्यशील मोहिते यांनी आठ दिवसांपूर्वीच शेखर गोरे यांची भेट घेतली होती. यावेळी रघुनाथराजे नाईक-निंबाळकर हेही बरोबर होते. या भेटीत धैर्यशील यांनी गोरे यांना लोकसभा निवडणुकीत मदत करण्याबाबत आवाहन केले होते. यावर गोरे यांनी शब्द दिला नाही. त्यामुळे शेखर गोरे यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. या पार्श्वभूमीवरच खासदार रणजितसिंह यांनी शेखर गोरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून चर्चा झाली. पण, या भेटीतील तपशील समोर आलेला नाही. तरीही गोरे यांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. कारण, मागील निवडणुकीत शेखर गोरे हे खासदार रणजितसिंह यांच्या पाठीशी उभे राहिले होते. यावेळी त्यांची भूमिका काय राहणार, याचा निर्णय झालेला नाही. तरीही ते उद्धवसेनेत आहेत. अशावेळी ते महाविकास आघाडीचा धर्म पाळणार का ? हे पाहणेही महत्त्वाचे ठरले आहे.

दहिवडीतील कार्यालयात माझी बैठक सुरू होती. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आले होते. दोघांच्या भेटीत माढा मतदारसंघाविषयी चर्चा झाली. पण, मी महाविकास आघाडीत आहे. तरीही महाविकास आघाडी माझे प्रश्न सोडवत नाही ताेपर्यंत मी प्रचारात सहभागी होणार नाही अशी सध्यातरी भूमिका घेतली आहे. - शेखर गोरे, जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना ठाकरे गट

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराmadha-pcमाढाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Ranjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर