कऱ्हाड तालुक्यातही लम्पीचा शिरकाव, लसीकरणाची मोहीम वेगात

By नितीन काळेल | Updated: August 23, 2023 18:29 IST2023-08-23T18:28:44+5:302023-08-23T18:29:44+5:30

सातारा : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा पुन्हा शिरकाव झाला असून फलटणनंतर आता कऱ्हाड तालुक्यात १० जनावरे बाधित झाली आहेत. त्यामुळे ...

Lumpy skin disease has re-entered in Satara district and after Phaltan now 10 animals are affected in Karhad taluka | कऱ्हाड तालुक्यातही लम्पीचा शिरकाव, लसीकरणाची मोहीम वेगात

कऱ्हाड तालुक्यातही लम्पीचा शिरकाव, लसीकरणाची मोहीम वेगात

सातारा : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा पुन्हा शिरकाव झाला असून फलटणनंतर आता कऱ्हाड तालुक्यात १० जनावरे बाधित झाली आहेत. त्यामुळे लम्पीच्या जनावरांचा आकडा १३ वर गेला आहे. तर लम्पी प्रतिबंधासाठी पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम वेगात सुरू केली आहे. आतापर्यंत ३ लाख १३ हजार पशुधनाला लसीचा डोस देण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून लम्पी चर्मरोगाचा शिरकाव झाला. कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी गावात प्रथम लम्पी बाधित आणि मृत पहिल्या जनावराची नोंद झाली. त्यानंतर जिल्ह्यात लम्पीचा प्रसार वाढत गेला. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांतील जनावरांना या आजाराने गाठले. त्यावेळी पशुसंवर्धन विभागाने लम्पी संकटापासून जनावरांना वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली होती. गोवंशीय जनावरांनाच हा रोग होत होता. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने गोवंशीय जनावरांचे लसीकरण पूर्ण केले. 

नोव्हेंबर महिन्यातच जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले होते. या लसीकरणानंतर मात्र, लम्पीने बाधित होणाऱ्या जनावरांचा आकडा कमी होत गेला. मार्चपर्यंत लम्पीला अटकाव बसला होता. मात्र, आता पुन्हा लम्पीचे संकट येत आहे.

Web Title: Lumpy skin disease has re-entered in Satara district and after Phaltan now 10 animals are affected in Karhad taluka