शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यातील धरणांत नीचांकी पाणीसाठा ; पाऊस लांबला तर परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:05 IST

हवामान खात्याच्या अंदाजानुसार साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे लोकांनी धीर धरावा. धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी सोडले जात आहे. लोकांनी पाण्याचा गैरवापर करू नये. पाऊस पडल्यानंतर परिस्थिती निश्चितपणाने बदलणार आहे. - श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी.

ठळक मुद्देपाच वर्षांचा आढावा : केवळ १४.८५ टीएमसी पाणी शिल्लक

सागर गुजर ।सातारा : जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असतानाच धरणांतील पाणीसाठ्यानेही तळ गाठला आहे. धरणांमध्ये गेल्या पाच वर्षांतील निचांकी पाणीसाठा उरला आहे. कोयना, उरमोडी, कण्हेर, धोम, धोम-बलकवडी, तारळी, वीर या मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणी आहे. सर्व धरणांत मिळून केवळ १४.८५ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलेआहे.

जिल्ह्यातील १९ लहान-मोठे व ३२ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या ११ जून रोजी ३२.८४ टीएमसी पाणी शिल्लक होते. याच तारखेला २०१४ मध्ये २२.३३ टीएमसी, २०१५ मध्ये ४०.२० टीएमसी, २०१६ मध्ये १६.४९ टीएमसी तर २०१७ मध्ये २१.०२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी म्हणजे केवळ १४.८५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. धरणांतील मृत पाणीसाठा वगळता हे पाणी उपयुक्त ठरणारे आहे. दरम्यान, कोयना धरणातून सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार रोज ३२०० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे दिवसागणिक कोयना धरणातील पाणीसाठाही कमी होत आहे.

संपूर्ण जिल्ह्यावर पाणी संकट ओढावले आहे. उन्हाळी पाऊस पुरेसा पडलेला नाही. मान्सूनही लांबणीवर पडला असल्याने जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. जिल्ह्यातील २५५ गावे व ९९८ वाड्या-वस्त्यांवर तब्बल २९० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. ४ लाख ७९ हजार ४८३ लोक व २ लाख ३३ हजार पशुधन टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. माण, खटाव, कोरेगाव, जावळी, फलटण, वाई, पाटण, महाबळेश्वर, खंडाळा, सातारा, कºहाड एकूण २७ टँकर फिडिंग पॉर्इंट आहेत. या ठिकाणीही धरणांतून पाणी सोडले जात असून, धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागलाआहे.

खटाव व माण या दोन तालुक्यांत उरमोडी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. कºहाडजवळच्या टेंभू प्रकल्पातूनही माण तालुक्यातील १६ गावांना पिण्याचे पाणी देण्यात आले आहे. दुष्काळग्रस्तांची तहान मोठ्या प्रकल्पांतून भागवली जात असली तरी आता या प्रकल्पांनीच तळ गाठल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी काटकसरीने पुरविण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. दुष्काळी भागातील येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी या छोट्या प्रकल्पांमध्ये तर पाण्याचा खडखडाट झाला आहे. मोरणा गुरेघर, उत्तरमांड, महू, हातगेघर, वांग-मराठवाडी हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्या गावांना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

२०१६ मध्ये कोयनेत विदारक चित्रयंदा कोयना धरणात ८.०८ इतके उपयुक्त पाणी शिल्लक आहे. मात्र, २०१६ मध्ये यापेक्षा विदारक परिस्थिती होती. तेव्हा कोयना धरणात केवळ ७.५८ टीएमसी पाणी शिल्लक राहिले होते. नंतर पावसाने साथ दिल्याने परिस्थितीत बदल झाला होता.धरणनिहाय उपलब्ध पाणीसाठा टीएमसीमध्येकोयना धरण ८.०८, धोम ०.०६, धोम बलकवडी ०.१३, कण्हेर १.३५, उरमोडी ०.६९, तारळी १.७६, नीरा-देवघर ०.१९, भाटघर १.१६, वीर ०.५०, येरळवाडी ०, नेर ०.०४, राणंद ०, आंधळी ०, नागेवाडी ०.०३, मोरणा गुरेघर ०.४७, उत्तरमांड ०.२५, महू ०.०७, हातगेघर ०.०४, वांग मराठवाडी ०.०३, लघू प्रकल्प ०.११.

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणwater shortageपाणीटंचाई