शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Lok Sabha Election 2019 सातारकर पुन्हा एकदा इतिहास रचतील : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:48 IST

पारंपरिक वाद्यांची साद, तुतारींचा निनाद, लमाणी महिलांचे पारंपरिक लेझीम नृत्य, ‘हॅटिट्रक होणारच’च्या टोप्या, महिलांबरोबरच आबालवृद्धांची गर्दी, ठिकठिकाणी औक्षण

ठळक मुद्देमोदींना अंतिम दिवस समीप आल्याची भीती

सातारा : पारंपरिक वाद्यांची साद, तुतारींचा निनाद, लमाणी महिलांचे पारंपरिक लेझीम नृत्य, ‘हॅटिट्रक होणारच’च्या टोप्या, महिलांबरोबरच आबालवृद्धांची गर्दी, ठिकठिकाणी औक्षण करणाऱ्या सवाशिणी, इमारतींवरून होणारी पुष्पवृष्टी आणि रणरणत्या उन्हातही तरुणाईचा जल्लोष अशा उत्साही वातावरणात राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अजित पवार यांनी सातारकर पुन्हा एकदा इतिहास रचतील, असा विश्वास व्यक्त केला.

उदयनराजे भोसले यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, माथाडींचे नेते अविनाश रामिष्टे, दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, रजनी पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या निवासस्थानी जलमंदिर येथे कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांच्यासमवेत भवानीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रतापसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. राजवाडा परिसरातील प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या जवाहर बागेतील पुतळ्यास अभिवादन केले. राजपथावरून कमानी हौद, शेटे चौकमार्गे पोलीस मुख्यालयासमोरून पोवई नाका अशी रॅली काढण्यात आली. पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले, त्यानंतर याच ठिकाणी सभा घेण्यात आली.

आ. अजित पवार म्हणाले, बेरोजगारी वाढविण्यात मोदी यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आपला वेळ वैयक्तिक टीका टिपण्णीपेक्षा विधायक कामासाठी घालवावा.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील या मोजक्या नेत्यांसोबत उदयनराजे भोसले यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.इथं मोदी पेढा...सातारकर उदयनराजेंसाठी वेडापोवई नाका येथे झालेल्या भाषणात केंद्रसरकारची खिल्ली उडविण्यात आली. देशात कोणतेही मोदी फेमस असतील, साताºयात मात्र मोदी पेढा आणि सातारकर उदयनराजेंसाठी वेडा, हे समीकरण आहे. हे समीकरण कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. त्यामुळे मागच्यावेळी पेक्षा अधिक मताधिक्य देण्यासाठी मतदारांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केले.सातारा लोकसभेसाठी आतापर्यंत आठ उमेदवारांचे अर्ज दाखलसातारा लोकसभा मतदार संघातून आत्तापर्यंत आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, वंचित आघाडीचे सहदेव ऐवळे, बहुजन समाज पार्टीचे आनंदा थोरवडे तर अपक्ष उमेदवारांत किशोर धुमाळ, शैलेंद्र वीर, सागर भिसे यांचा समावेश आहे. 

अजान होईपर्यंत भाषण थांबलेपोवई नाक्यावर खासदार उदयनराजे भोसले यांचे भाषण सुरू असताना ध्वनिक्षेपकावर अजान सुरू झाली. हा आवाज ऐकताच उदयनराजेंनी आपले भाषण थांबवले. अजान संपल्यानंतर उदयनराजेंनी आपले भाषण पुढे चालू केले.‘रिपाइं’ गटाचाही सहभागराष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी रिपाइंचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मोती चौकापासून हातात रिपाइंचे झेंडे घेऊन हे कार्यकर्ते घोषणा देत रॅलीत सहभागी झाले. रॅलीच्या अग्रभागी राहून या कार्यकर्त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

 

टॅग्स :satara-pcसाताराPoliticsराजकारणElectionनिवडणूक