शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

Lok Sabha Election 2019 प्रभावशाली नेत्यांचा प्रचारात अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:30 PM

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : निवडणुकांच्या प्रचारसभा गाजविणारे अनेक धुरंधर नेतेमंडळी ऐन लोकसभा निवडणुकीत ‘न्यूट्रल’ झाले ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : निवडणुकांच्या प्रचारसभा गाजविणारे अनेक धुरंधर नेतेमंडळी ऐन लोकसभा निवडणुकीत ‘न्यूट्रल’ झाले असल्याने त्यांचा अभाव जाणवताना पाहायला मिळत आहे. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, शालिनीताई पाटील, बकाजीराव पाटील, श्रीनिवास पाटील यांच्या गैरहजेरीची चर्चा मतदार संघात जोरदार सुरू आहे.माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, त्यांचे चिरंजीव अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार शालिनीताई पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील आदी नेत्यांच्या प्रभावशाली भाषणांसाठी लोक गर्दी करत असत. एक काळ असा होता की या नेत्यांपैकी अनेकांना मुलूख मैदान तोफ ही बिरुदावली लावण्यात आली होती. आता हीच मंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात म्हणाव्या तितक्या प्रमाणात सक्रिय दिसत नाहीत.काहीजण केवळ हजेरी दिसण्यासाठी ठराविक सभांना येतात. मात्र, सातत्याने प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी होताना कोणी दिसत नाहीत. कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील काँगे्रसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांनी कुणालाच दुखवायचे नाही, अशी भूमिका घेतलेली दिसते. माजी खासदार श्रीनिवास पाटील हे तर खासदार शरद पवार जेव्हा सातारा जिल्ह्यात सभा घेतात, त्याच व्यासपीठावर उपस्थित राहतात. इतर सभांना त्यांनी आपली हजेरी लावलेली दिसत नाही.शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांची नरेंद्र पाटील यांच्या प्रचारातील उपस्थिती तुरळक आहे. नितीन भरगुडे-पाटील हे लोणंद येथे उदयनराजेंच्या प्रचारासाठी झालेल्या सभेला गेले होते. त्यानंतर लोकांमध्ये मिसळून जो प्रचार करायला हवा, तो करताना ते दिसले नाहीत. खंडाळ्यातील ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांना शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नेते भेटून गेले. मात्र, पाटील हेही प्रचारात सक्रिय दिसत नाहीत. पाटणचे नेते विक्रमसिंह पाटणकर हे उदयनराजेंच्या प्रचाराची मोठी सभा असेल तरच व्यासपीठावर पाहायला मिळतात.कोरेगावच्या माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कोरेगावात मेळावा घेतला होता. मागील विधानसभा निवडणुकीत प्रलोभनाला भुललेल्या मतदारांमुळे आपला पराभव झाला, असा त्यांनी आरोप केला होता. आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरोधात काम करत असताना खासदार उदयनराजे भोसले आपल्याला मदत करतील, असे शालिनातार्इंना वाटले होते. मात्र लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांच्या हातात-हात घालून प्रचार सुरू केल्याने शालिनीतार्इंचा भ्रमनिरास झाल्याची चर्चा कोरेगाव तालुक्यात सुरू आहे.अलिप्त राहण्यामागे विधानसभेचे गणितखासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे आमदार झाडून कामाला लागले आहेत. आपापल्या सुभ्यात प्रचारफेऱ्या काढून उदयनराजेंना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या निमित्ताने या आमदार मंडळींच्या विधानसभा प्रचाराची पहिली फेरी पार पडली आहे. आमदारांविरोधात त्या-त्या मतदार संघात विरोधाची लाट आहे. विधानभेची निवडणूक लढण्याची सुप्त इच्छा मनात असणारी मंडळी या निवडणुकीत अलिप्त आहेत. आपण जर या निवडणुकीत फिरलो तर या आमदार मंडळींनाच फायदा होऊन आपल्या अडचणी वाढतील, या भावनेपोटी व विधानसभेचे गणित डोक्यात ठेवून अनेकजण या निवडणुकीत अलिप्त राहिलेले पाहायला मिळत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक