शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाला ताळा.. बाळंतिणीला मरण‘कळा’!

By admin | Updated: November 29, 2015 00:48 IST

बिबी आरोग्य केंद्राचा कारभार : नाईलाजाने दुसऱ्या दवाखान्यात जाताना रुग्णवाहिकेतच प्रसूती

सूर्यकांत निंबाळकर ल्ल आदर्की रात्री एक वाजता बाळंतकळा सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले; पण रुग्णालयाला कुलूप! असह्य वेदनांनी ती तडफडत होती. वडील डॉक्टरांना फोन लावून थकले. प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर १०८ नंबर लावला अन् रुग्णवाहिका आली. दुसऱ्या रुग्णालयात जात असताना वाटेतच तिची सुखरूप सुटका झाली अन् सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. ही घटना आहे फलटण तालुक्यातील बिबी येथील. दरम्यान, येथील आरोग्य केंद्राच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. शासन जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरोदर मातांना शासकीय रुग्णालयात बाळंतपण करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यासाठी संबंधित मातेला अनुदान दिले जाते. शिवाय मोफत रुग्णवाहिकेचीही सोय पुरविली जाते. ग्रामीण भागातील महिला बाळंतपणासाठी शासकीय रुग्णालयातच जातात. मात्र, तरीही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, गैरहजेरीमुळे शासनाच्या या उद्देशाला खो बसत असल्याचे फलटण तालुक्यातील बिबी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या प्रकारावरून सिद्ध झाले आहे. बिबी येथील ऊर्मिला वर्पे हिच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिचे वडील बाबासो पवार व कुटुंबातील महिलांनी तिला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री एक वाजता उपचारासाठी घेऊन गेले. त्यावेळी दवाखान्याला कुलूप होते. म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. खताळ यांना मोबाईलवरून संपर्क साधला पण प्रतिसाद मिळाला नाही. आई-वडील दोघेही रुग्णालयात मोठ्या हाका मारल्या तरीही कुणी आले नाही. ऊर्मिला रुग्णालयाच्या व्हरांड्यात वेदनेने विव्हळत होती. अखेर तिचे वडील बाबासो पवार यांनी १०८ नंबरवर फोन केला अन् सगळा प्रकार सांगितला. काही वेळातच रुग्णवाहिका आली. ऊर्मिलाला फलटण येथे घेऊन जात असताना तिला वेदना असह्य होऊ लागल्या. रुग्णवाहिकेसोबत असलेले डॉ. अडसूळ यांनी गाडी बाजूला उभी करायला लावली. अशातच ऊर्मिलाची गाडीमध्येच प्रसूती होऊन तिला कन्यारत्न झाले. वाटेतच रुग्णवाहिकेत प्रसूत झालेल्या ऊर्मिलाला पुढील उपचारासाठी फलटण येथील रुग्णालयात नेले. परंतु बिबी आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणा तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.