शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

कर्ज देण्याच्या बहाण्याने पावणेचार लाखांची फसवणूक, दोघांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:11 IST

बनावट कर्ज प्रकरणातून वसुली करुन एकाची कार जप्त करून पावणेचार लाखाची फसवणूक केल्याचे दि. १६ रोजी उघडकीस आले. याप्रकरणी हैद्राबाद येथील फायनान्स कंपनीच्या मालकासह पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आणखी एकाची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकर्ज देण्याच्या बहाण्याने पावणेचार लाखांची फसवणूक, दोघांना गंडा हैदराबादमधील फायनान्स कंपनीच्या पाचजणांवर गुन्हा

सातारा : बनावट कर्ज प्रकरणातून वसुली करुन एकाची कार जप्त करून पावणेचार लाखाची फसवणूक केल्याचे दि. १६ रोजी उघडकीस आले. याप्रकरणी हैद्राबाद येथील फायनान्स कंपनीच्या मालकासह पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आणखी एकाची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.आदेश बंब (रा. हैद्राबाद), विशाल उर्फ संतोष राशनकर (रा. पुणे), गिरीष शहा (रा. पुणे), विश्वनाथ महेंद्र सुपेकर व अनिकेत संतोष जाधव (दोघे रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय विलास माळी (रा. श्रीनाथ कॉलनी, रामकुंड, सातारा) यांना कर्जाची आवश्यकता होती. हैद्राबाद येथील वीर फायनान्स कंपनीच्या वरल पाचजणांनी संगनमत करुन विजय माळी यांच्या घरी एका एजंटला पाठविले आणि कर्ज देतो असे सांगून त्यांच्या कारचे आरसी बुक, आधार कार्ड व सात धनादेश घेतले.

३ लाख ८० हजार रुपयांच्या कर्जासाठी फायनान्स कंपनीच्या लोन अ‍ॅग्रीमेंट फॉर्मवर सह्या घेतल्या. दरम्यान संबंधित फायनान्स कंपनीकडून कोणतेच कर्ज न देता कर्जाच्या वसुलीसाठी विजय माळी यांची कार जप्त करुन संबंधितांनी ३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली.विजय माळी यांचे मित्र महेंद्र वसंतराव भोईटे (रा. खेड, ता. जि. सातारा) यांना ४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करुन त्या कर्जाची रक्कम भोईटे यांना आदा न करता त्यांचे गाडीवर देखील बोजा नोंद करुन त्यांचीही फसवणूक केली. कर्ज देण्याच्या बहाण्याने बनावट कर्जप्रकरण तयार करुन दोघांना लाखो रुपयांना गंडा घातला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर